हेरले / प्रतिनिधी
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत व मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत चालविलेल्या उपचार केंद्राची आरोग्य सेवा व विलगिकरण केंद्राच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत केलेले उपचार म्हणजे सामाजिक बांधिलकीतून केलेले हे गौरवास्पद कार्य म्हणजे महाराष्ट्रात आदर्श मानले जाणारे आहे. असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील मोफत उपचार केंद्र व विलगिकरण केंद्रास भेटी प्रसंगी बोलत होते. ग्रामपंचापत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन , सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपचार केंद्र व कोविड केअर सेंटर सुरू केले आहे या केंद्रास सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
ग्रामपंचायत व आरोग्य सेवा देणाऱ्या असोसिएशनने हेरले गावातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणून त्यांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी मोफत घर टू घर आरोग्य तपासणी, आरटीपिसीआर व अँटीजन चाचण्या, रूग्ण वाहिका, घोडावत कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना भरती सेवा, लक्षणे नसलेली मात्र पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना उपचार सुरू केले आहेत. आदी मोफत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवाच्या स्तुत्य उपक्रमाची पाहणी करून त्यांच्या सेवाभावी कार्यास प्रेरणा देण्यासाठी आम. राजूबाबा आवळेंनी या उपचार केंद्रास भेट दिली. या प्रसंगी डॉ. अमोल चौगुले यांनी या केअर सेंटरची त्यांना सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी वैद्यकिय अधिकारी राहूल देशमुख, पोलिस पाटील नयन पाटील, राजेंद्र कचरे, अर्जून माने, तलाठी एस.ए. बरगाले, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. अमोल चौगुले ,डॉ. नितीन चौगुले, डॉ. सुरेखा आलमान, डॉ. इम्रान देसाई,प्रविण पाटील महमंद जमादार आदीसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
हेरले : येथील कोविड केअर सेंटरच्या भेटी प्रसंगी आम. राजूबाबा आवळे, राजेंद्र कचरे वैद्यकिय अधिकारी, डॉ. राहूल देशमुख, पोलिस पाटील नयन पाटील व अन्य डॉक्टर्स
No comments:
Post a Comment