Monday, 14 June 2021

मुख्याध्यापक संघाच्या विधायक भूमिकेमुळे एकसंघपणे शैक्षणिक प्रश्नसोडवणूकीसाठी निश्चित उपयोग होईल - आम. जयंतराव आसगांवकर


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचा नुतन पदाधिकारी सत्कार समारंभ

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.14/6/21
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबईच्या उपाध्यक्षपदी
कोल्हापूरचे व्ही. जी. पोवार, विभागीय अध्यक्षपदी एन. आर. भोसले, पदसिध्द सदस्यपदी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष  सुरेश संकपाळ तर सदस्यपदी शिवाजीराव कोरवी यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या राजर्षि शाहू सभागृहात पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. 
             शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील वैचारिक मतभेद बाजूला सारत मुख्याध्यापक संघाने सर्वांना बरोबर घेवून जाण्याची विधायक भूमिका घेतल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सुटण्यासाठी याचा
निश्चितच जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला उपयोग होईल अशा विधायक भूमिकेला माझे पाठबळ नेहमीच राहील.
      शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड म्हणाले, शिक्षण क्षेत्रात जिल्हा स्तरावर निर्माण झालेले मतभेद महामंडळाच्या निवडीने दूर झाले असून एकसंघपणे प्रयत्न केल्यास आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास मदत होईल.
       व्ही जी पोवार म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील नव्याने येवू घातलेल्या आव्हानाना तोंड देण्यासाठी नेहमीच
मुख्याध्यापक संघाच्या पाठिशी राहण्याचे अभिवचन दिले.
   यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, संघाचे सेक्रेटरी दत्ता पाटील, व्हा.  चेअरमन बाबासाहेब बुगडे, जॉ.सेक्रेटरी अजित रणदिवे, मार्गदर्शक जीवनराव साळोखे, मुख्याध्यापक संघाचे संचालक सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, विभागीय अध्यक्ष एन. आर. भोसले व एस.टी.चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हा. चेअरमन मिलिंद पांगिरेकर तर आभार महामंडळ सदस्य शिवाजीराव कोरवी यांनी मानले.

      फोटो 
 महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचा नुतन पदाधिकारी सत्कार समारंभप्रसंगी शिक्षक आमदार जयंतराव आसगांवकर सोबत एस डी. लाड, बाबा पाटील, बी.आर, बुगडे, मिलिंद
पांगिरेकर, जीवनराव साळोखे, दत्ता पाटील, अजित रणदिये, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील. एस.टी. चौगुले आदी मान्यवर.

No comments:

Post a Comment