कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.13/6/21
*शिक्षकांना दहावी निकालाची कामे वेळेत करण्यासाठी, तसेच शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करिता शिक्षकांना covid-19 ड्युटीतून मुक्त करावे,* अशी मागणी डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंच कोल्हापूर यांचेवतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले.
त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रांतील विविध प्रश्नासंबंधी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व वेतनपथक अधीक्षक कोल्हापूर यांनाही निवेदन देण्यात आले. covid-19 ड्युटीतून शिक्षकांना मुक्त करावे, नवीन शिक्षक व शिक्षकेतर भरती सुरु करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन व प्रॉव्हिडंट फंड रकमा विनाविलंब आदा कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.
या शिष्टमंडळामध्ये मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार, उपाध्यक्ष एस.के.पाटील, ए.एस.रामाने, के.के.पाटील, बी.बी.पाटील, रंगराव तोरस्कर, उदय पाटील, दत्तात्रय जाधव, राजेंद्र खोराटे, एस.टी.चौगुले यांचा समावेश होता.
फोटो
शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे अधिक्षक एन एम शिंदे यांना लेखी निवेदन देतांना डी बी पाटील शैक्षणिक विचारमंचचे शिष्ट मंडळ.
No comments:
Post a Comment