हेरले / प्रतिनिधी
दि.8/6/21
सोशल मीडियामुळे जेव्हा एकीकडे साध्या साध्या गोष्टीचा इव्हेंट साजरा करण्याची पद्धत रूढ झाली असताना, दुसरीकडे सोशल मीडियाचा वापर करत आणि अत्यंत निस्वार्थी अशा पद्धतीने आपल्या आजुबाजूच्या समस्या जाणून घेणे आणि नेहमीच अशा कठीण काळात सुद्धा टी टी सी चॅरिटेबल ट्रस्ट, ,नृसिंह फाउंडेशन हालोंडी यांनी या विषाणूंचा धोका आणि त्याबाबत आवश्यक असणारी जनजागृतीची मोहीम सर्वप्रथम या ग्रुपने हाती घेतली.
गर्दी कमी करण्यासाठी थेट लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व पटवून देणे, बाहेर गावाहून आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे, या बाबतीत प्रशासनाला सर्व प्रकाराचे सहकार्य या ट्रस्ट मार्फत करण्यात आले.
एकीकडे जनजागृती बाबत काम सुरू असताना आवश्यक व गरजू लोकांची माहिती गोळा करणे व त्यांना प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी या ट्रस्ट कमालीची तत्परता दाखवली. यासाठी या ट्रस्ट सदस्यांनी स्वेच्छेने वर्गणी काढून त्यातून गरजू लोकांच्या पर्यंत 20 रेशन किट पोहचवण्याचे कार्य केले.
या कार्यामध्ये सर्वात मोठा मदतीचा हात हा शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि कर्मचारी व Vagmi फाउंडेशनचे समारियाह मॅडम यांचा लाभला. यांच्या पुढाकाराने गरजू लोकांना ७० रेशन किट व ४०० परिवाराला एक महिन्याचे मल्टी व्हिटॅमिन व व्हिटॅमिन सी चे टॅबलेट देण्यात आले. आवश्यक ती सर्व मदत करण्यास देखील पुढाकार घेतला आहे. अनेक भुकेल्या कुटुंबांना मदतीचा हात देऊन समाजकार्य अविरत चालू करून शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो. नि. किरण भोसले करून एक अत्यंत कौतुकास्पद कार्य केले, यातून समाजासाठी पोलिस प्रशासन सदैव उपलब्ध आहेत याचे उत्तम उदाहरण दिले.
या कार्यक्रमास राजेंद्र चौगुले, जे. बी पाटील , सुनील पाटील , बाबूराव चौगुले ,गणपती चौगुले, अजय पाटील, किरण कांबळे ,किरणं महाजन ,सचिन चौगुले ,अतुल नाईक ,निलेश चौगुले यांनी नियोजन केले होते.
फोटो
हालोंडी : येथे मोफत औषधे वाटप करतांना मान्यवर
No comments:
Post a Comment