Sunday, 6 June 2021

संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये 'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा

हातकणंगले / प्रतिनिधी

संजय घोडावत पॉलीटेक्निकमध्ये  'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री.विराट गिरी यांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पॉलीटेक्निकचे कार्यालयीन सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री.विराट गिरी म्हणाले '' छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी ६ जून हा आनंदाचा दिवस. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा अरुणोदय झाला, शासनाने हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यास सांगितलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा मिळाला आहे. महाराज अत्यंत धाडशी आणि उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि याच्या जोरावरच मुघल सामाज्र्याचा नायनाट केला यासाठी त्यांनी गनिमी कावा व अन्य युद्धरणनीतीचा वापर केला.''
या आयोजनाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत, विश्वस्त श्री.विनायक भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment