Sunday, 25 July 2021

पूराच्या पाण्यामुळे रस्त्यावर अडकलेल्या ट्रकचालक व प्रवासी आदी दोनशे जणांना भोजन व नाष्टा वाटप

हेरले / प्रतिनिधी
दि.25/7/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील दिशा पेट्रोलपंपच्या वतीने मालक माजी सभापती राजेश पाटील यांनी ट्रक चालक  व बस प्रवासी आदी दोनशे जणांना शनिवारी रात्री जेवण व रविवारी सकाळी नाष्टा वाटप करून सामाजिक बांधिलक जपली.
     सांगली -कोल्हापूर राज्यमार्गावर हेरले येथील देसाई मळा व हेरले गाव ओढयावर पूराचे पाणी दोन ते सहा फूट आले आहे. त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद झाला आहे. या रस्त्यावरील वाहनचालक प्रवासी रस्त्यावर अडकून पडले आहेत. त्यांना शुक्रवार सायंकाळ पासून गावकरी जेवण - खाण्याची  मदत करीत आहेत.
          दिशा पेट्रोल पंपचे मालक माजी सभापती राजेश पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा जि प सदस्या डॉ. पद्याराणी पाटील, पोलिस पाटील नयन पाटील, रोहन पाटील , दिशा पेट्रोल पंपचे मॅनेजंर भरतेश चौगुले, सिनिअर मॅनेजंर अमर हांडे व कर्मचारी यांच्या वतीने  ट्रकचालक व प्रवासी आदी दोनशे जणांना भोजन व नाष्टा वाटप करण्यात आला.
       फोटो 
हेरले येथील दिशा पेट्रोल पंपच्या वतीने द वाहन चालक व प्रवाश्यांना जेवन वाटप करतांना माजी सभापती तथा जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील व अन्य.

No comments:

Post a Comment