कसबा बावडा : दि. 27
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर, भाऊसो महागावकर विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय तसेच कसबा बावडा परिसरातील महापुरामुळे पूरग्रस्त म्हणून शाळेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पूरग्रस्तांना इनरव्हील क्लब कोल्हापूर सनराइज् च्या अध्यक्षा शर्मिला खोत,सेक्रेटरी मनीषा जाधव व पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू कपडे, सॅनिटायझर, सॅनिटरी,हातरूमाल,मास्क साडी, साबण , तांदूळ,डाळ,बिस्किटे खाऊचे सोशल डिस्टन्स चे पालन करून वाटप करण्यात आले
शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चे आपत्तीकाळात पूरग्रस्तांना मदत करून देशाची सेवा करत आहेत कार्य कौतुकास्पद असे गौरवोदगार काढले.
कसबा बावडा मधील जय हिंद स्पोर्ट, भारतवीर मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते सचिन चौगले, अनिकेत चौगले,अनिकेत कदम, मुरलीधर चौगले,कपिल पवार, ऋषिकेश चव्हाण, राजू शेख,नामदेव जाधव,अरविंद भोसले, मनोज कुरणे हे नगरसेवक सुभाष बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.
भाऊसाहेब महागावकर च्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment