हेरले / प्रतिनिधी
दि.28/10/21
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सभेमध्ये गावातील ऊस तोडणी संदर्भात सर्वांच्या वतीने सर्वसमावेषक कृषी संवर्धन कमिटी स्थापन करून खालील निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. ही सभा शेतकरी सोसायटीमध्ये संपन्न झाली.स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच राहुल शेटे यांनी केले.
ऊस तोडणीसाठी कोणत्याही शेतकऱ्याने मजुरांना व कारखाना कर्मचाऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत,
जर पैशाची मागणी केली तर शेतकऱ्यांनी कमिटीशी किंवा कारखाना व्यवस्थापन समितीस संपर्क साधावा,
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला जेवण किंवा दोनशे रुपये द्यावे,जादा पैशाची मागणी केल्यास कमिटीशी संपर्क साधावा, शेतकऱ्याला ऊस तोडताना एक कोयत्याला ५पेंढी प्रमाणे वाढे देने बंधनकारक राहील, शेतामध्ये वाट करून द्यायची जबादारी शेतकऱ्यावर राहील, ट्रॅक्टर ट्रॉली अडकलेस ओढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर आणनेची जबाबदारी शेतकऱ्यावर राहील, वाहतूक करून ऊस भरणेसाठी संबंधित मुकादम व शेतकरी आपापसात ठरवतील,साखर कारखाना व्यवस्था पणाने पूरग्रस्त भागातील ऊस जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या ७० :३० फॉर्म्युल्या प्रमाणे तोडावे, कारखाना कर्मचाऱ्यांनी क्रमपाळी प्रमाणे ऊसतोड देने बंधनकारक राहील,वरील सर्व गोष्टी बद्दल तक्रार असतील तर गावातील कमिटीशी संपर्क साधावा. असे आव्हान कमिटीच्या वतीने करण्यात आले.
ही सभा माजी उपसभापती अशोक मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रसंगी जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक , लक्ष्मण निंबाळकर, प्रा. राजगोंड पाटील , माजी सरपंच झाकीर देसाई , अशोक चौगुले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी उपसरपंच संदीप चोगुले, उपसरपंच फरीद नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळगोंड पाटील, सुरेश चौगुले , गुरुनाथ नाईक, दादासो कोळेकर , मजीद लोखंडे, राजू खोत, पांडुरंग चौगुले, राहुल जाधव, अल्लाउद्दीन खतीब, सुरज पाटील, सिद्धार्थ पाटील,प्रदीप सुरवशी,सर्व कारखान्याचे प्रतिनिधी, तोडणी वाहतूकदार, मुकादम व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
फोटो
हेरले येथे शेतक-यांच्या सभेत बोलतांना जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment