हेरले / प्रतिनिधी
दि.28/10/21
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी धोंडीराम चौगुले तर व्हा.चेअरमन पदी आनंदा जाधव यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक हातकणंगले येथील मकसूद शिदी व धनाजी पोवार यांनी काम पाहिले .
यावेळी आघाडीचे नेते सतीश कुमार चौगुले, सुरेश कांबरे, अँड. विजय चौगुले, सतीश वाकरेकर, अविनाश पाटील, बाळासो थोरवत, महादेव शिंदे, सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, सचिव प्रकाश वाकरेकर, यांच्यासह नूतन संचालक व सभासद उपस्थित होते. निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
No comments:
Post a Comment