Friday, 12 November 2021

विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचा वापर नवसंशोधनासाठी करावा: - सदाशिव चौगुले बालावधूत हायस्कूलमध्ये लॅबचे उद्घाटन'

  हेरले /प्रतिनिधी 
शालेय दशेत विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड व कल्पकता निर्माण होऊन भावी काळात संशोधक निर्माण व्हावेत या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अटल टिंकरिंग लॅब व आय.सी. टी. लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये  नवसंशोधनाची आवड निर्माण व्हावी .असे प्रतिपादन बालावधूत  हायस्कूलचे संस्थापक सदाशिव चौगुले यांनी व्यक्त केले.
        मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील बालावधूत हायस्कूलमध्ये उभारलेल्या  टिकरिंग लॅबचे व आय. सी. टी. लॅबचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रूपाली कसबेकर व  गौतमी कसबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहरूनिसा बारगीर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात बालावधूत महाराज व  साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. 
         रूपाली कसबेकर म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना रोबो टेक्नॉलॉजीची गरज आहे. आणि नेमके तेच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या शाळेत दिले जाते. या रोबो टेक्नॉलॉजीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात शालेय जीवनातच मोठी भर पडलेली आहे .या शाळेतील विद्यार्थी भविष्यकाळात शाळेचे नाव उज्वल करतील व शाळेच्या विकासात भर घालतील असेही त्या म्हणाल्या .यावेळी विद्यार्थ्यांनी रोबोटची वेगवेगळी प्रात्यक्षिके स्टेजवर सादर केली .
         या कार्यक्रमास मेहरुनिसा बारगीर, रूपाली कसबेकर, गौतमी कसबेकर. सोनाबाई चौगुले,शाळेचे संस्थापक सदाशिव चौगुले, बाळासो कराळे, नारायण संकपाळ, सचिव संजय चौगुले, मुख्याध्यापक संजीव चौगुले, यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आर.एस. स्वामी यांनी केले. तर आभार वैशाली करके यांनी मानले.
  
फोटो 
 अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करताना गौतमी कसबेकर, रूपाली कसबेकर, मेहरुनिसा बारगीर, सोनाबाई चौगुले, व अन्य मान्यवर (छाया सुरेश कांबरे )

No comments:

Post a Comment