हेरले (प्रतिनिधी)
दूध उत्पादक हेच खरे दूध संस्थेचे तारणहार आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेती बरोबर पशुपालनाकडे अधिक लक्ष द्यावे .यातून आर्थिक उत्पन्न तर मिळतेच शिवाय आपले आरोग्यही चांगले राहते.जय हनुमान दूध संस्थेने गोकुळ दूध संघाच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादक सभासदांसाठी विविध योजना राबवून त्यांची आर्थिक उन्नती साधली आहे. असे प्रतिपादन जय हनुमान दूध संस्थेचे चेअरमन सतीश कुमार चौगुले यांनी व्यक्त केले .
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील श्री जय हनुमान सहकारी दूध संस्थेच्या वतीने म्हैस दुधास लिटरला ९ रुपये ५० पैसे व गाय दुधास लिटरला ४ रुपये ६० पैसे असे उच्चांकी फरक बिल देऊन सुमारे २४ लाख रुपये फरक बिलाचे व भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब थोरवत होते. प्रारंभी आर्थिक वर्षात संस्थेला झालेल्या नफा तोटा याचे विषयी संस्थेचे सचिव आण्णासो पाटील यांनी माहिती दिली .यावेळी दूध उत्पादक सभासद व विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास व्हा. चेअरमन नेताजी माने ,जयवंत चौगुले, सुरेश कांबरे, शकील हजारी, महादेव शिंदे, रहीम नायकवडी, सुभाष मुसळे, महादेव चौगुले, सुनील सुतार, यांच्यासह संस्थेचे दूध उत्पादक सभासद, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महादेव शिदे यांनी केली. तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले.
फोटो
दूध उत्पादक सभासदांना फरक बिलाचे वाटप करताना चेअरमन सतीशकुमार चौगुले ,बाळासाहेब थोरवत, सुरेश कांबरे,व इतर मान्यवर.
No comments:
Post a Comment