Friday, 3 December 2021

कोजिमाशि पतसंस्थेकडून सभासदांसाठी १० लाख रुपयांची अपघात विमा योजना जाहीर

*.* 
पेठ वडगांव / प्रतिनिधी
मिलींद बारवडे 
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८८३६ सभासदांना १० लाख रुपये विमा कवच असणारी अपघात विमा योजना दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ पासून १ वर्षासाठी कार्यान्वित राहील. या अपघात विमा योजनेतून संस्थेच्या सभासदांसाठी ८८३ कोटी ६० लाख रुपये इतके विमा कवच  लागू राहील. सदर विम्याची  प्रीमियम रक्कम कोजिमाशि पतसंस्थेमार्फत  भरली आहे अशी माहिती कोजिमाशि  पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी दिली. पतसंस्थेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्री.आनंद कुलकर्णी, ब्रँच मॅनेजर श्रीकांत कोले व सल्लागार  योगेश सकट यांनी कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन बाळ डेळेकर,व्हा.चेअरमन सुभाष पाटील,सीईओ अरविंद पाटील यांचेकडे अपघात विमा पॉलिसी सुपूर्द केली.याप्रसंगी कोजिमाशिचे संचालक कैलास सुतार, अनिल चव्हाण,संदीप पाटील,सौ.सुलोचना कोळी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे,संगणक  अधिकारी नितीन शिंदे,प्रशासन अधिकारी उत्तम कवडे आदी उपस्थित होते. सदरच्या अपघात विमा योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांचा  लाभ दिला जाणार आहे. तसेच अंशतः अपंगत्व आल्यास म्हणजे  एक डोळा,एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास ५ लाख रुपये विमा कवच सभासदांना मिळणार आहे. सदरची योजना कोजिमाशि पतसंस्थेच्या सभासदांना वरदान ठरणार आहे अशी माहिती चेअरमन बाळ डेळेकर यांनी दिली.सभासदांकडून कोणतीही विमा हप्ता रक्कम भरून न घेता या अपघात विमा  योजनेची संपूर्ण रक्कम कोजिमाशि पतसंस्था स्वतः भरणार आहे हे या योजनेचे वैशिट्य मानावे लागले.स्वतः विम्याची रक्कम भरणारी कोजिमाशि पतसंस्था ही जिल्ह्यातील पहिली संस्था ठरली आहे.

No comments:

Post a Comment