: अनुसूचित जाती प्रवर्गातून दावेदारी :
हेरले / प्रतिनिधी
मौजे वडगाव येथील शिवसेना शहर प्रमुख व माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा बँकेच्या कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या सूचनेनुसार व शिवसेना पदाधिकारी यांचे उपस्थित अर्ज दाखल केला. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसेना सदैव कार्यरत आहे. त्या अनुषंगाने मी केलेल्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला निश्चितपणे शिवसेनेची उमेदवारी मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली .
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, शिव सहकार सेना जिल्हा संघटक संजय जाधव, तालुका संघटक संदीप दबडे, रमेश शिंदे, पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन धोंडीराम चौगुले, बाळासो थोरवत, ग्रा.पं .सदस्य अवधूत मुसळे ,अविनाश पाटील, महादेव शिंदे ,सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, अण्णासो पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो
शिवसेना शहर प्रमुख माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी जिल्हा बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, संजय जाधव, संदीप दबडे ,व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment