हेरले / प्रतिनिधी
शासनाच्या सर्व सोई सुविधा दिव्यांगापर्यंत पोहचविणार असे प्रतिपादन माजी सभापती जि.प. सदस्या डॉ पद्माराणी पाटील यांनी केले त्या हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे वेद अपंग सेवाभावी संस्थेने जागतीक अपंग दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी हातकणंगले पंचायत समितीचे सहाय्यक गटविकासअधिकारी विजय देशमुख होते.
सहाय्यक गटविकास अधिकारी विजय देशमुख म्हणाले,संस्थेला प्रशासनाचे पुर्ण सहकार्य देण्यात येईल.अपंगांना ग्रामपंचायत न घरफाळा आणि पाणीपट्टीत सवलत द्यावी.
यावेळी ग्रामपंचायत स्वनिधीतुन अपंगांना 5% निधी धनादेश वाटप करण्यात आले.हेरले डाँक्टर असोशिएशनने आपल्या खाजगी दवाखान्यात पन्नास टक्के सुट दिव्यांगांना जाहीर केली आहे.
यावेळी सरचिटणीस मुनिर जमादार , वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख ,माजी उपसरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य निलोफर खतीब , दादासो कोळेकर ,ग्रामसेवक संतोष चव्हाण वेद संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भोसले यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास वेद अपंग सेवाभावी संस्था हेरलेचे अध्यक्ष शिवाजी भोसले , उपाध्यक्ष अमित पाटील,
सदस्य संदीप पाटील ,संजय शेंडगे हाशिम मुलाणी, सुरेश चोगुले ,सुरेश मगदूम ,उज्वला परमाज, दीपाली माकणे ,भाग्यश्री जाधव ,संदिप पाटील यांचेसह सदस्य उपस्थित होते.
फोटो :- जागतीक अपंग दिना निमित्त कार्यक्रमामध्ये बोलताना माजी सभापती जि.प. सदस्या डॉ पद्माराणी पाटील शेजारी मुनिर जमादार, डॉ.राहुल देशमुख व अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment