Tuesday, 14 December 2021

हेरले येथे महावितरणवर मोर्चा

हेरले / प्रतिनिधी

   सन 2020 व 2021 या दोन वर्षांमध्ये कोरोनाची जागतिक महामारी आपल्या हेरले परिसरात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बऱ्याच लोकांचे रोजगार व नोकरी गेली आहे.त्यामुळे सर्वच कुटुंबातील आर्थिक गणित कोलमडली आहेत.त्यामध्येच महावितरण कंपनीने अन्यायकारक वीज दरवाढ केली आहे व मनमानी पध्दतीने वीज कनेक्शन तोडले  जात आहे.त्याविरोधात हेरले ( ता. हातकणंगले) येथील सर्व पक्षीय कृती समिती व युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून लेखी निवेदन महावितरणचे हेरले कनिष्ठ अभियांता संदीप कांबळे यांना देण्यात आले.
    लेखी निवेदनाचा आशय असा की
 घरगुती वीज बिलामधील दंड व्याज आकारणी रद्द करण्यात यावी,
अन्यायकारक वाढविलेला स्थिर आकार व १६%वीज शुल्क यामध्ये कपात करणेत यावी,ताबडतोब वीज तोडणी बंद करण्यात यावी,शेती वीज बिलासाठी कृषी संजीवनी योजनेला डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ देणेत यावी,शेतामधील वीज पूर्ववत दिवस व रात्र पाळी मध्ये १० तास करणेत यावी.या सर्व बाबींचा विचार करून महावितरण कंपनी ने ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन करणेत येईल असा लेखी निवेदनाद्वारा इशारा देण्यात आला. 
     या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शुभम मोरे,हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार,कुमार इंगळे,डी एन पाटील उपसरपंच फरीद नायकवडी, शिव सेनेचे माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच संदीप चौगुले,राहुल शेटे,दादासो कोळेकर, मज्जीद लोखंडे, शिवराज घेवारी, राजू खोत,इसुब पेंढारी, साजिद नायकवडी, संतोष उलस्वार, दादासो भोसले, श्वेतांबर रुईकर आदी उपस्थित होते.
       
लेखी निवेदनाद्वारे मागणी केलेल्या मागण्या महावितरण च्या वरिष्ठ अधिकारांच्याकडे पाठवित आहे. यामधून योग्य निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील आहे असे आश्वासन हेरले कनिष्ठ अभियांता संदीप कांबळे यांनी दिले.

      फोटो 
हेरले ( ता. हातकणंगले) येथील सर्व पक्षीय कृती समिती व युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून विविध मागण्यांचे लेखी निवेदन महावितरणचे हेरले कनिष्ठ अभियंता संदीप कांबळे यांना देतांना शुभम मोरे  माजी सभापती राजेश पाटील मुनिर जमादार व अन्य पदाधिकारी.

No comments:

Post a Comment