Friday, 17 December 2021

कठोर परिश्रम हाच क्रीडा स्पर्धेतील यशाचा गुरुमंत्र आहे-आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिज्ञा पाटील.


पेठ वडगाव / प्रतिनिधी

    हातकणंगले तालुक्यातील मिणचे येथील आदर्श विद्यानिकेतन ॲण्ड ज्युनियर कॉलेज मिणचे या प्रशालेचाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
   या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय नेमबाज  अभिज्ञा पाटील, राष्ट्रीय खेळाडू दीपक बागल, सोएब शिकलगार, अक्षय जाधव, बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम. ए. परीट, क्रीडा विभाग प्रमुख  शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
      प्रशालेतील राष्ट्रीय खेळाडू हर्षवर्धन केकेले, पार्थ खोत, अथर्व साळवे या खेळाडूंनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व खेळाडूंना अमरिष बहिरगौडे यांनी क्रीडा शपथ दिली. उद्घाटन प्रसंगी कुस्ती, आर्चरी, मलखांब, योगा व बॉडी बिल्डिंगचे चित्तथरारक प्रात्यक्षिके विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  क्रीडा विभागाचा अहवाल जिमखाना प्रमुख शिवाजी पाटील यांनी सादर केला. आपल्या मनोगतातून आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील ने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदका  पर्यंतचा प्रवास कसा खडतर होता व कठोर परिश्रमाशिवाय ते साध्य करता आला नसता हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितला व वार्षिक क्रीडा महोत्सव साठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेचे माजी विद्यार्थी व  राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू शिकलगार यांनी मैदानावरील अनुभवांचा जीवन प्रवासात पावलोपावली उपयोग होतो हे नमूद केले. इचलकंजी येथील प्रसिद्ध बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते यांनी आपल्या खेळाडूंना सोबत घेत बॉडी बिल्डींगची चित्तथरारक प्रात्यक्षिके व महत्त्व विशद केले.
    संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे यांनी  प्रशासनाच्यावतीने विद्यालयांमध्ये चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमाचे आभार डॉ. डी. एम. शेटे यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप तोडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुगल मीट द्वारा पालका पर्यंत पोचवण्यात आले.

        फोटो 
 वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ज्योत प्रज्वलीत करतांना आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील, राष्ट्रीय खेळाडू दीपक बागल, सोएब शिकलगार, अक्षय जाधव, बॉडी बिल्डर शिवप्रसाद सातपुते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम. ए. परीट, क्रीडा विभाग प्रमुख  शिवाजी पाटील आदी मान्यवर.

No comments:

Post a Comment