Friday, 17 December 2021

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन.



पेठ वडगाव / प्रतिनिधी
        
  सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलीत छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेचा शैक्षणिक वर्ष 2021 / 22 साल चा वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दीपप्रज्वलनाने व क्रीडा ज्योतीच्या व शस्त्र पूजनाने झाली. 
   प्रमुख पाहुणे एम.आय.डी.सी. शिरोली पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक  राजेश खांडवे म्हणाले गरीबीचे चटके सोसलेले व आई-वडील यांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती जीवनात कधीही वाया जात नाही.  खेळातून मनुष्य शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होतो त्यामुळे आयुष्यातील संकटाला सामोरे जाताना आपणाला बळ देतात. त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील काही चित्तथरारक अनुभवाचे उदाहरणेही दिली.
    प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख कवायत संचलनाच्या माध्यमातून  उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कुस्ती मल्लखांब कराटे रोप स्किपिंग व लाटीकाठीच्या चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि सर्वच उपस्थितांची मने जिंकली.
   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान  विष्णू जोशीलकर विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, आयुष्यात खडतर प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जा कोणत्याही परिस्थितीत यश तुमचेच असेल.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक  राजेंद्र माने यांनी आपल्या भाषणातून प्रशालेच्या खेळाची दैदिप्यमान  अशी परंपरा सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच उत्तम करियर घडवण्याचा राजमार्ग या अनुषंगाने खेळाचे महत्व पटवून सांगितले.
     कार्यक्रमास राष्ट्रीय कुस्ती खेळाडू  जयदीप जोशिलकर,  मिणचे सरपंच रंजना जाधव,उपसरपंच अभिनंदन शिखरे, संस्थेचे खजानीस  बापुसो माने, क्रीडा महोत्सव प्रमुख  सागर आवळे, प्रशालेचे विभाग प्रमुख सासणे, एम आर पाटील, किशोर इंगळे, बाजीराव डोंगरे, जिमखाना प्रमुख  आनंद पाटील, दिशा इंग्लिश मीडियम स्कूल क्रीडा प्रमुख पी के चौगुले , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी कार्यक्रमास उपस्थितीत होते.  सूत्रसंचालन  एस.जे.सासणे व एम आर पाटील यांनी केले तर आनंद पाटील  यांनी  आभार मानले.

      फोटो 
छत्रपती शिवाजी व विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेत सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सव चे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांचा सत्कार करतांना संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माने सपोनि राजेश खांडवे व मान्यवर.

No comments:

Post a Comment