Tuesday, 4 January 2022

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठवडगावमध्ये कलाविष्कार महोत्सवाचे शानदार उद्घाटन.


 हेरले / प्रतिनिधी

  छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन  जुनिअर कॉलेज  दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या कलाविष्कार  महोत्सवाचे उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायत संचलनाच्या माध्यमातून पाहुण्यांना शानदार मानवंदना दिली.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. बोराडे म्हणाले, स्वतः या प्रशालेच्या यशाची वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार असून संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर  पसरत आहे.पालकांच्या अपेक्षापूर्ती करणारी एकमेव शाळा म्हणून प्रशालेची यशस्वी वाटचाल कौतुकास्पद आहे. येणारी पिढी आदर्श व आदर्शवत घडवण्याचे काम या प्रकारच्या माध्यमातून सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील या उद्दिष्ट उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र माने यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
     यश मिळवण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना सांगताना त्यांनी नेहमीच शाश्वत गोष्टीचा स्वीकार करा व शिस्तबद्ध जीवन जगताना अपयशाची भीती न बाळगता नवनवे प्रयोग करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.  चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मोठ्या लोकांचे आत्मचरित्राचे वाचन करा, तुमच्यातील सुप्तगुणांना बाहेर काढून स्व-विकास करा असा संदेशही  त्यांनी या प्रसंगी दिला.
        प्रमुख पाहुणे  संगीता चव्हाण  नुतन  संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती वडगाव व नूतन संचालक बामणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजेंद्र माने संस्थेचे उपाध्यक्ष  प्रदिप दरवान, सचिव  सुवर्णा माने ,खजानीस  बापुसो माने सर्व विभागांचे विभाग प्रमुख कलाविष्कार प्रमुख हे ए. बी .गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  
 कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्याध्यापक  राजेंद्र माने यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कलाविष्कार  महोत्सवाचे स्वरूप स्पष्ट केले तसेच या कलाविष्कार महोत्सवात पार पाडणार्‍या विविध स्पर्धेची माहिती सांगितली. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवातील यशस्वी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. कलाविष्कार महोत्सवाचे प्रमुख  ए. बी.गावडे  व एन. पी. दरवान  यांचा व विभाग प्रमुख,जिमखाना प्रमुख यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापिका पाटील व  एस. ए. मोरे यांनी केले . एस. डी. सोरटे  यांनी  आभार मानले.
       फोटो 
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेमध्ये कलाविष्कार महोत्सवाचे  उद्घाटन प्रसंगी बी जी बोराडे यांचा सत्कार करतांना मुख्याध्यापक राजेंद्र माने व अन्य मान्यवर.

No comments:

Post a Comment