हेरले / प्रतिनिधी
सुसंस्कृत समाज घडवणे ही पत्रकारांची जबाबदारी असून शिरोली इंडस्ट्रीज एरिया रिपोर्टर असोसिएशन (सिएरा)चे पत्रकार ही जबाबदारी योग्य रितीने पार पाडत आहेत, असे प्रतिपादन हातकणंगले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. सौ सोनाली पाटील यांनी केले. सिएराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी पत्रकार दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्योगपती जैन म्हणाले की, पत्रकारांची विकासाची दृष्टी असली की समाजाचाही विकास होतो. उद्योजकांच्या समस्या मांडण्यासाठी पत्रकार नेहमीच तत्पर असतात. एमआयडीसीच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.
सपोनि भोसले म्हणाले की, कोरोना आणि परिस्थितीच्या काळात चांगली साथ दिली आणि जबाबदारीने वार्तांकन केले.
गुन्हेगारी बाबत प्रबोधन करण्यासाठी पत्रकारांची चांगली साथ मिळत असल्याचे मत सपोनि राजेश खांडवे यांनी व्यक्त केले.सीएराचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वागत तर
सुनील कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन तर विश्वास चरणकर यांनी आभार मानले.
यावेळी दीपक ऐतवडे, सतीश पाटील, संदीप कांबळे, हरी बुवा आदी पत्रकार उपस्थित होते.
फोटो
हातकणंगले पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती डॉ. सोनाली पाटील व ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांचा सत्कार करतांना अभिजीत कुलकर्णी सुरेश पाटील विश्वास चरणकरसह अन्य मान्यवर.
No comments:
Post a Comment