Sunday, 30 January 2022

मौजे वडगाव येथे आरसीसी गटर्स कामाचा शुभारंभ

      हेरले (प्रतिनिधी)

 सामाजिक कार्य करीत असताना युवा पिढीने गट तट न मानता एकत्र आल्यास गावाचा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो असे मत पंचायत समितीचे सदस्य उत्तम सावंत यांनी व्यक्त केले. ते मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील विकास कामा च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते.
            मौजे वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे व  अमोल झांबरे यांच्या विशेष प्रयत्नातून व पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या पंचायत समिती १५ वा वित्त आयोग फंडातून येथील गल्ली नंबर ५ मध्ये आरसीसी गटर्स कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
        यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, सरपंच काशिनाथ कांबळे, माजी उपसरपंच किरण चौगुले, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, बाळासो थोरवत, दिलावर हजारी, अमोल झांबरे, स्वप्नील चौगुले, संतोष मोरे ,संजय वड्ड, यांच्यासह गल्ली नंबर ५ मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील यांनी मानले. 

 फोटो 
 मौजे वडगाव येथील गल्ली नंबर ५ मध्ये आरसीसी गटर्स शुभारंभ प्रसंगी उत्तम सावंत, काशिनाथ कांबळे, किरण चौगुले, अविनाश पाटील ,अवधूत मुसळे ,व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment