Saturday, 5 February 2022

प्राथमिक शिक्षक संघाची दिनदर्शिका वितरण व हळदी कुंकू समारंभ उत्साहात


कोल्हापूर : दि.०५-०२-२०२२
                   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शहर शाखा-कोल्हापूर च्या वतीने शैक्षणिक दिनदर्शिका 2022 वितरण व हळदी-कुंकू समारंभ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मा.श्री.राजाराम वरुटे सर व प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी मा.श्री.डी.सी.कुंभार साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
                  याप्रसंगी बोलताना मा.श्री.राजाराम वरुटे साहेब यांनी माहितीपूर्ण दिनदर्शिका या उपक्रमाचे कौतुक केले.या दिनदर्शिके प्रमाणे संघाच्या प्रत्येक सभासदाने आपले शैक्षणिक कार्य उठावदार करण्याचे आवाहन केले. यावेळी संघटनेच्या आय. टी.सेल प्रमुख पदी श्री.सुशील जाधव व श्री.मच्छिंद्र बगाड यांची निवड जाहीर करणेत आली.नूतन कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
                   यानंतर उपस्थित महिला सभासदांचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.महिला आघाडी प्रमुख सौ.वैशाली अजितकुमार पाटील तसेच नूतन महिला संघटक सौ.स्वाती लंगडे व सौ.संध्या कोरे यांनी सर्व उपस्थित महिलांना वाण देऊन संघटन बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणेचे आश्वासन दिले.  
       मा.प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार साहेब यांनी दिनदर्शिकेची माहिती घेतली . यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी  विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.  प्राथमिक शिक्षण समिती कडून राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमामध्ये शिक्षक संघ नेहमी आघाडीवर राहील याची पदाधिकाऱ्यांनी  ग्वाही दीली. 
                     संघटनेचे नूतन अध्यक्ष श्री.राजेंद्र पाटील सर यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेचे मार्गदर्शक श्री.व.प.चव्हाण सर प्राथमिक शिक्षण समितीकडील लेखापाल श्री.बाबा साळोखे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 
                      या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व नूतन पदाधिकार्याचा सत्कार पार पडला.  यानंतर  सर्व महानगरपालिका शाळांना दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.  
                       या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती कडील शैक्षणिक पर्यवेक्षक मा.श्री.विजय माळी, मा.श्री.बाळासाहेब कांबळे, क्रीडा निरीक्षक मा.श्री.सचिन पांडव सर, संघटनेचे सेवानिवृत्त व नवीन प्रवेशित सभासद व पदाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती कडील कार्यालयीन स्टाफ, शाळांचे मुख्याध्यापक, सभासद शिक्षक,शिक्षिका, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                    कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर नेते श्री.सुनिल गणबावले सर यांनी केले तर सरचिटणीस  श्री.दिलीप माने यांनी मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment