कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट- अंतर्गत उप शिक्षणाधिकारी पदावरील राज्यातील ५२ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी डी.एस.पोवार यांना कोल्हापूर बोर्डाचे सहसचिव म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
शिक्षण विभागाने नुकतेच शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढला आहे.
दत्तात्रय शंकर पोवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन १ जुलै १९९५ पासून वर्ग २ राजपत्रित अधिकारी म्हणून उमरगा जिल्हा उस्मानाबाद येथे त्यांच्या अधिकारी पदाच्या कार्याची सुरुवात झाली. जुलै १९९७ पासून २००० पर्यंत गट शिक्षणाधिकारी म्हणून पंचायत समिती कवठेमंकाळ,
जून २०००ते २००४उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर,
२००४ ते २००८ या कालावधीत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली,२००९ ते २०१२ उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, २०१२ ते २०१६ उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रत्नागिरी, २०१६ते २०२० या कालावधीमध्ये शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आदी ठिकाणी यशस्वीपणे अधिकारी पदाचे कार्य बजावले.
सप्टेंबर २०२० ते २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कार्यरत व सध्या पदोन्नतीने सहसचिव कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर येथे निवड झाली आहे. वर्ग १ अधिकारी पदी या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment