Friday, 25 February 2022

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस ( A + ) मानांकन

हेरले / प्रतिनिधी

कोल्हापूरचे  विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस  ( A + ) असे मानांकन दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे हे प्रमुख उपस्थित होते. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याची महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी बुधवारी अंतर्गत तपासणी पुर्ण केली. 
श्री. लोहिया यांनी सुमारे दोन तास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीचा आणि विविध नोंदींचा आढावा घेतला. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, तक्रारदारांचे केलेले समाधान, गुन्हे उघडकीस आणणे, तपास पूर्ण करणे आदी बाबींचा सविस्तर आढावा घेत महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यास ए प्लस  ( A + ) असे मानांकन दिले आहे. 
औद्योगिक वसाहतीमधील उद्योगातून होणार्‍या चोरीचा छडा लावणे, पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेली काळजी, महत्वाचे चौक व,सीसी टीव्ही कॅमेरे बसवून चोवीस तास तेथील घडामोडींवर लक्ष केंद्रीत करणे, अंतर्गत शिस्त, कर्मचाऱ्यांचे वागणे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश आहे. 
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, प्रशिक्षणार्थी आयपीएस गोकुळकुमार, पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील आदी उपस्थित होते. 
...................

No comments:

Post a Comment