: वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संघटनेच्या वतीने मुदाळतिट्टा येथे के पी पाटील पॉलिटेक्निक हॉलमध्ये रविवारी ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा तसेच रुग्णांना तातडीने लागणारी रक्ताची गरज लक्षात घेऊन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तदान शिबिर हे मुदाळतिट्टा येथे घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि रक्तदान करण्यासाठी आलेल्या पहिल्या महिला रक्तदात्या सौ माया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रवीण पिसाळ, कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी, दिनेश कदम, सचिन खेतले, शिरीष देवरे, देव मोरे, विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.या शिबिरात 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले.. अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक देसाई यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिकेत गायकवाड व विजय देसाई यांनी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment