हेरले / प्रतिनिधी
कासारवाडी हायस्कूल कासारवाडीमध्ये चालू शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विज्ञान प्रदर्शन, गणितीय उपक्रम त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा, शाळेचे आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी व मागील शैक्षणिक वर्षातील एस. एस. सी. परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा स्पर्धेमधील खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.किरण चौगुले, प्रा. उत्तम वडिंगेकर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा.पी.एन. तोडकर होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एन.घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन एम. एस.पाटील यांनी केले. यावेळी व्ही. बी. डोंबाळे, एस.ए .आडुरकर, एस. डी. तोडकर, एस .टी. भांगरे के. जे. घाटगे, व्ही. एस.जाधव सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment