हेरले / प्रतिनिधी
पुलाची शिरोली येथील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेल्या शिरोली विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
नुतन संचालक मंडळ.
शब्बीर देसाई, संजय पाटील, धनाजी पाटील (सिक्सर), सतिश पाटील, जगन्नाथ पाटील, मदन संकपाळ, संदीप वंडकर, चंद्रकांत जाधव, बाबासाहेब कांबळे, अमित मुखरे, विश्र्वास गावडे, श्रीमती कमल सोडगे, श्रीमती अनुसया करपे.
निवडणुकीसाठी सत्ताधारी महाडिक गट व विरोधी शाहू समविचारी आघाडी या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सर्वसाधारण गटामध्ये ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधील माजी उपसरपंच उदय पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील व भाजपाचे दिलीप शिरोळे या तिघांचे उमेदवारी अर्ज कर्जाची उचल न केल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. तर शाहू आघाडीचे शंकर कोळी यांचा इतर मागास प्रवर्ग गटातील अर्ज दाखल्यावरुन अपात्र ठरविण्यात आला होता.
या निवडणुकीसाठी विद्यमान चेअरमन निवास कदम, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, माजी चेअरमन नारायण मोरे, के.व्ही. पाटील, सदाशिव संकपाळ, राजकुमार पाटील, शब्बीर देसाई, दिनकर पाटील, बजरंग खवरे, बाबासाहेब कांबळे आदी मान्यवर व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी सर्वसाधारण कर्जदार गटांमध्ये २७, महिला गटांमध्ये ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटांमध्ये २, भटक्या विमुक्त गटामध्ये २, अनुसूचित जाती जमाती गटामध्ये ३, असे एकूण ४० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी होवून तब्बल अठ्ठावीस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने हि निवडणूक बिनविरोध पार पडली. याची घोषणा १० मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक डॉ. प्रगती बागल करणार आहेत.
हि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी उपसरपंच उदय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, छत्रपती राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, कृष्णात खवरे, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, मारुती वंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर माजी चेअरमन नारायण मोरे, के.व्ही.पाटील, दिनकर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील, बजरंग खवरे, सदाशिव संकपाळ आदींचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment