...............................
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा काखे येथील ए.एस.के.फौडेंशन यांच्यावतीने फौडेंशनचे अध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी व युवराज चव्हाण, विजय चौगुले यांच्या हस्ते मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना अनेक नेते,स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली अशाच एका कोविड सेंटरची चर्चा राज्यासह अवघ्या देशभरात झाली होती. पारनेरन विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल १ हजार १०० बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. फक्त कोविड सेंटर उभा करुन निलेश लंके थांबले नाहीत तर कोरोना रुग्णांवरील औषधोपचार,आहार इ. गोष्टींकडेही त्यांनी एखाद्या डॉक्टरप्रमाणे लक्ष दिलं.कोविड सेंटरमध्ये योग शिबिरं आयोजित करुन लंके यांनी रुग्णांच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली.या कोव्हीड काळात आम.लंके यांच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून मदतीचा हात दिला
आमदार लंके यांच्या कामाचं कौतुक म्हणूनच ए.एस.के.फौडेंशन, काखे यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. मेजर मारुती सूर्यवंशी, विजय चौगुले, युवराज चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी (अध्यक्ष ), दिपक सूर्यवंशी वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी मोरे, शिवाजी जंगम , शुभम लठ्ठे, विशाल कावळे, संदिप दाईंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो- काखे येथे पारनेरचे आमदार लंके यांचा ए.एस.के.फौडेंशन, काखे यांच्यातर्फे मेजर मारुती सूर्यवंशी, विजय चौगुले, युवराज चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी,दिपक सूर्यवंशी , शुभंम लठ्ठे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment