कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन तर्फे देण्यात येणारा 'मेस्टा एक्सलंट स्कूल अवॉर्ड' फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी नागाळा पार्क यांना कोल्हापूरला देण्यात आला. हा पुरस्कार राज्यभरात उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना प्रदान करण्यात आला.
शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते तसेच शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञान, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, विविध शाळाबाह्य उपक्रम तसेच विद्यार्थांचा बौद्धिक शारीरिक विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्थापक अण्णासाहेब मोहिते, मा मुख्याध्यापक सॅविओ फर्नाडिस सतत क्रियाशील असतात. या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला.
या पुरस्काराचे वितरण १९ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री नाम. ओमप्रकाश कडू, शालेय शिक्षण मंत्री नाम. वर्षाताई गायकवाड, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पर्यटन व पर्यावरण विशेष उपस्थिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डेव्हिड प्लॅनेट ऑस्ट्रेलिया या मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक सॅविओ फर्नांडिस यांनी उच्चशिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
फोटो
मुंबई : शाळेचे मुख्याध्यापक सॅविओ फर्नांडिस यांनी उच्चशिक्षण मंत्री नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना.
No comments:
Post a Comment