हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जवळपास ९००शिक्षक शाळेमध्ये कमी आहे असे असताना शिक्षक पदरमोड करून बदली शिक्षक नेमून शाळा चालवत आहेत. कोरोना काळातसुद्धा सुट्टी असताना विद्यार्थी हितासाठी शाळा चालू ठेवल्या होत्या. शिष्यवृत्ती परीक्षा किंवा इतर परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले आहे.यामागे शिक्षकांचे योगदान नाकारता येणार नाही. असे असताना जिल्हा परिषदेमध्ये मात्र अनेक विद्यार्थी हिताचे किंवा शिक्षक हिताचे प्रश्न प्रलंबित ठेवले जात आहे. जर हे प्रलंबित प्रश्न सोडवणूक झाली नाही. तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा कोल्हापूर मार्फत बुधवार दिनांक 13 एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर समोर घंटानाद तथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रलंबित प्रश्न शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीनुसार व्हावा,दोन - दोन महिने उशिरा पगार करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई व्हावी ,चौथी व सातवी ची विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा एप्रिल महिन्यात व्हावी,
समुपदेशन झालेल्या विज्ञान शिक्षकांना नेमणुकीचे आदेश मिळावेत,
समाजशास्त्र व भाषा विषयाच्या अतिरिक्त शिक्षकांचे अध्यापन करणाऱ्या विषयानुसार मॅपिंग व्हावे,मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती बदल्या पूर्वी लवकर व्हावे,
दुर्गम शाळांचे निकष शासन जीआर प्रमाणे तीनच असावेत, प्रलंबित मेडिकल बिले सेवानिवृत्त बिले व इतर आर्थिक दिले वर्षानुवर्षे प्रलंबित राहत आहेत शिक्षकांच्या या नुकसानीस जबाबदार यंत्रणेवर कारवाई व्हावी व ती बिले आदा करावेत या प्रश्नासाठी यापूर्वी वारंवार चर्चा व बैठका झालेले आहेत. मात्र प्रशासनाने प्रश्न तसेच प्रलंबित ठेवलेले आहेत तेव्हा या प्रश्नाचे निर्गत दिनांक १२ एप्रिल २०२२ पूर्वी करावी तसे न झाल्यास दिनांक १३एप्रिल 2022 रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर समोर घंटा तथा धरणे आंदोलन केले जाईल. अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर व जिल्हा पोलिस प्रमुख यांना दिले आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सरचिटणिस सुनिल पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील, नेते रघुनाथ खोत, संघटक सुनिल एडके, जयवंत पाटील, किरण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत.
No comments:
Post a Comment