Thursday, 7 April 2022

हैदराबाद येथील राष्ट्रीय महिला हॅण्डबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ रवाना

हेरले / प्रतिनिधी

50 वी राष्ट्रीय महिला हॅण्डबॉल निवड चाचणी दिनांक रविवार. 27.03.2022 रोजी छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव व राष्ट्रप्रेम क्रीडा शैक्षणिक संस्था या ठिकाणी महाराष्ट्र महिला संघ जाहीर करण्यात आला. या संघामध्ये महाराष्ट्रातून 43 खेळाडू निवड चाचणीसाठी सहभागी झाले होते त्या मधुन महाराष्ट्रात राज्यांचा संघ घोषित करण्यात आला.
हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे खजिनदार.श्री राजेंद्र राऊत सर यांनी संघ निवड जाहीर केली.या स्पर्धा हैदराबाद तेलंगणा येथे 29 मार्च ते 3 एप्रिल 2022 रोजी होणार असुन 28 मार्च रोजी कोल्हापूर या ठिकाणांहून महाराष्ट्र राज्याचा संघ रवाना झाला. महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे .
सायली खाडे, स्वप्नजा मोरबाळे,प्रतिक्षा पवार, प्रियांका मोहिते पाटील, कोल्हापूर.
स्नेहल वागोले, तेजश्री निकते,
प्रीती वसेकर,पुणे.
गायत्री चव्हाण, सोलापूर.
रेखा राठोड.पालघर.
शितल कर्पे. अहमदनगर.
गीतांजली मालवणकर,रायगड.
सावली मोहिते,सांगली.
पूजा दिल्लीकर.बुलढाणा
पूनम कडव. करीशमा दुर्वे,नागपूर.
कल्याणी सांगुनवेडे,अकोला.
स्नेहल वाकचवरे.नाशिक.

या संघाला शुभेच्छा देण्यासाठी सह्याद्री एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष,व हॅण्डबॉल असोसिएशन कोल्हापूर चे उपाध्यक्ष.श्री. राजेंद्र माने सर.हँण्डबॉल असो,कोल्हापुरचे. सचिव श्री.इम्तियाज शेख.सर. सह सचिव श्री.निहाल शिकलगार.हॅण्डबाॅल असो.कोल्हापुर सदस्य.श्री.ईलाइ बंडवल.श्री,राकेश ठाकरे.पालघर.मनिषा गारगोटे.पुणे. उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment