हेरले / प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळातून शशिकांत ऊर्फ राजू शामराव गोरड हे दिनांक 30 एप्रिल रोजी आस्थापना पर्यवेक्षक , अधिकारी वर्ग-२(क.) या पदातून सेवानिवृत्त झाल्यामुळे मौजे वडगावचे माजी सरपंच रावसाहेब चौगुले यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित मान्यवर, युवा कार्यकर्ते व जेष्ठ वडीलधारी मंडळी उपस्थित होती.
यावेळी मौजे वडगावचे सुपुत्र शशिकांत उर्फ राजू गोरड यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. राजू यांनी मुंबईसारख्या ठिकाणी कामगार चळवळीचे नेतृत्व केले असून नाट्य क्षेत्रातही त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना सामाजिक व नाट्यक्षेत्रातील विविध पुरस्कार मिळाले असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या सोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ मंगल शशिकांत गोरड याही मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनाही विविध पुरस्कार प्राप्त झाल्याचे
डॉ.विजयकुमार गोरड यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना राजू गोरड म्हणाले, गाववाल्यांकडून मिळालेला हा सन्मान मर्मबंधातील ठेव समजून आयुष्यभर हृदयात साठवून ठेवीन. मित्र वर्गाकडून झालेलं कौतुक आणि उपस्थित वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद माहेरची शिदोरी समजून सदैव स्मरणात ठेवीन. यापुढेही सामाजिक कार्यासाठी आजच्या सत्कारामुळे एक नवी ऊर्जा मिळेल आणि मौजे वडगावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन. आई - वडिलांचे आशिर्वाद आणि वाढवडिलांच्या पुण्याईमुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच रावसाहेब चौगुले, श्रीकांत सावंत, विजय चौगुले, सतीश चौगुले, सुरेश कांबरे,अवधूत मुसळे, रामचंद्र चौगुले,महेश कांबरे, हसीम मुलांनी, रमेश लोंढे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून राजू गोरड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आण्णासो तोरसकर, नारायण संकपाळ, धनपाल मुसळे, सुनील खारेपाटणे, रांझा पटेल, नारायण हराळे, बापूसाहेब शेंडगे , संतोष लोंढे, नितीन घोरपडे, मारुती शेंडगे, विनायक शेंडगे, अमोल झांबरे, गौतम तराळ , कृष्णात सावंत, संजय सावंत, संजय ढेरे , बाळासो बारगीर, हसन बारगीर, शशिकांत सावंत इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. भगवान कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment