Thursday, 9 June 2022

संजय घोडावत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे एचएससी परीक्षेत यश


हेरले / प्रतिनिधी

मार्च २०२२  मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एच एस सी) परीक्षेत संजय घोडावत ज्युनिअर कॉलेज कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता १२  वी सायन्स मध्ये ४९५ विद्यार्थ्यापैकी ४६९ विद्यार्थी व कॉमर्स शाखेच्या ५७ विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थ्यांनी  ७५ % गुणांपुढे असून विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये कॉमर्स शाखेतून सृष्टी साखरे -९५ % गुण-प्रथम क्रमांक, समृद्धी अनाजे, पार्थ दाहोत्रे व श्रुती हुल्ले - ९३.५० % गुण-द्वितीय क्रमांक, विवेक चव्हाण  याने ९३.३३% %गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच  स्नेहा पाटील-९२%, रिद्धी संघानी-९२%, रिया देशमुख-९१.८३%, सानिया जसुजा-९१.५०% व निकिता हरण-९०.३३% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
यामध्ये सायन्स शाखेतून सारा जाधव -९५.५० % गुण-प्रथम क्रमांक, आर्या आळवेकर -९४ %गुण-द्वितीय क्रमांक, कुलदीप पुजारी याने ९२.८३ %गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच ऋता भणगे -९२.६६ %, सलोनी शिंदे- ९२.६६ % गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
याचबरोबर सायन्स शाखेतून आय टी विषयात ३५ विद्यार्थी, कॉमर्स मधून १ विद्यार्थीनी तसेच कॉमर्स शाखेमध्ये गणित विषयात सृष्टी साखरे व स्नेहा पाटील यांनी  १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
याबद्दल बोलताना संचालक श्री.वासू सर म्हणाले '' जुनिअर कॉलेजने आपल्या उच्चांकी निकालाच्या माध्यमातून पालक व विद्यार्थी यांची विश्वासाहर्ता प्राप्त केली आहे आणि ही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही तत्पर राहू''.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी संचालक वासू सर, सेंटर हेड गुप्ता सर, प्राचार्या सौ.चैताली गुगरी व सर्व स्टाफ, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment