शिरोली येथील सुभाष सदाशिव पाटील यांची राष्ट्रसेवा प्रशाला या हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी निवड करण्यात आली आहे. सुभाष पाटील हे गेली तीस वर्ष या हायस्कूलमध्ये ज्ञानार्जनाचे काम अविरतपणे बजावत आहेत. हायस्कूलची निर्मिती करत असताना सुरुवातीची तब्बल एक दशकाहून अधिक काळ त्यांनी नाम मात्र पगारावर नोकरी केली. त्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहुन शाळेला शासकीय मान्यता मिळवली व त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांचे सह सर्व शिक्षकांचे जीवनमान फुलले. या हायस्कूलचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा त्यांनी सर्वांच्या सहकार्याने अविरतपणे सुरू ठेवली आहे. या निवडीबद्दल त्यांचे शिरोली पंचक्रोशीत व शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे. याकामी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पोवार, उपाध्यक्ष बाजीराव सातपुते व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.
"मैञीसाठी कायपण"
या शाळेचे मुख्याध्यापक शंकर बाबूराव चौगुले यांचा कालावधी दोन वर्षे शिल्लक होता. पण त्यांची व सुभाष पाटील यांची मैञी म्हणजे शोले मधील जय विरु सारखी. आपल्या नंतर सुभाषला अवघी दोन वर्षे मुख्याध्यापक पदी नियुक्ती होणार होती. शाळेच्या संपूर्ण उभारणीत दिलेले योगदान व मैत्रीचा विचार करून चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिला व पाटील यांना मुख्याध्यापकाची संधी दिली. या त्यांच्या योगदानाच आदर्श इतरांनाही घेतला पाहिजे.
No comments:
Post a Comment