Tuesday, 30 August 2022

श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे ब्रह्मलीन श्री सद्गुरु विनयानंद महाराज यांची व्दितीय पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

हेरले / प्रतिनिधी
श्री सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे ब्रह्मलीन श्री सद्गुरु विनयानंद महाराज यांची व्दितीय पुण्यतिथी निमित्त दि. ६ व  ७ सप्टेबर या दोन रोजी आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
         मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी स. ८ वा. श्रीमत् ज्ञानेश्वरी पारायण (अध्याय ९ व १२) व्यासपीठ चालक ह.भ.प. श्री. नारायण महाराज एकल (जोगेवाडी ) 
     बुधवार दि. ७ सप्टेंबर २०२२ इ. रोजी
सुर्योदय ६:२७ वा.: 'श्री' चे पादुकांना अभिषेक,सकाळी ८:०० ते ९:०० : नोंदणी व चहापान,सकाळी ९:०० ते ११:०० भजन श्री भजनी मंडळ, डॉ. गुंडोपंत कुलकर्णी व शौकत बहुरूपी, हेरले,सकाळी ११:०० ते १२:०० प्रवचन परमार्थभूषण ह.भ.प. श्री. नारायण महाराज एकल (जोगेवाडी) दुपारी १२:०० ते १२:०५ श्री सद्गुरु विनयानंद महाराज पुण्यतिथी सोहळा,दुपारी १२:०५ ते १:०५ : प्रवचन सद्गुरु श्री शामनाथ बत्ते महाराज ( इचलकरंजी)
दुपारी १:०५ ते १:१५ : सत्कार समारंभ स्वामीभक्त श्री. नंदू आण्णा माणगांवकर यांच्या अमृतहस्ते,दुपारी १:१५ ते ३:३० : महाप्रसाद,दुपारी ३:३० ते ५:३० : अभंगवाणी, सादरकर्ते  शरद गुरव (संगीत विशारद )आणि सहकारी, रा. तुंग, जि. सांगली,सायं. ५:३० ते ६:३० प्रवचन ह.भ.प. गुरुवर्य श्री भावानंद महाराज, मंगरायाचीवाडी, सायं. ६:४७: सुर्यास्त व आरती होणार आहे.या सर्व कार्यक्रमास भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव यांच्या वतीने केले आहे.

Tuesday, 23 August 2022

विद्यार्थ्यांनी डिजिटल युगाचा वापर करावा* प्रशासनाधिकारी -- डी सी कुंभार.

** कोल्हापूर प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक ११, कसबा बावडा कोल्हापूर च्या शाळेच्या 151 वर्धापन दिनानिमित्त डी सी कुंभार साहेब बोलत होते. शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 आहे त्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेविका माधुरीताई लाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी  डी सी कुंभार साहेब होते .कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास माधुरी ताई लाड यांनी हार घालून सुरुवात झाली.
प्रमुख मान्यवरामध्ये भारतवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले सामाजिक कार्यकर्ते शामराव पाटील तसेच बावडा रेस्क्यू फोर्सचे मानसिंग जाधव ,मुख्याध्यापक शिवराज नलवडे व प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी इत्यादी होते.
 शाळेतील विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा,भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, महाराष्ट्र सभा हिंदी परीक्षा, कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा इत्यादी स्पर्धांच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष माधुरीताई लाड बोलताना म्हणाल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन आपल्या बावड्याचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले .

प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी शाळेचे डिजिटल युगाचा वापर विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणासाठी करावा व आपले ज्ञान अद्यावत ठेवावे जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शंका मनात राहणार नाही त्याबद्दल जागृत राहावे असे आवाहन केले .

शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये शाळेच्या गुणगौरव म्हणून झालेल्या 151 वर्षाच्या इतिहासातील डॉक्टर,वकील, इंजिनिअर, आदर्श शेतकरी, आदर्श व्यवसाय,नगरसेवक,यशस्वी उद्योजक, आदर्श मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक विविध क्षेत्रात चमकलेले विद्यार्थ्यांनी शाळेसाठी योगदान दिलेले आहे असे उज्वल परंपरा त्याने आपल्या स्वागत प्रास्ताविकांमधून सांगितले.

 कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले यांनी विद्यार्थ्यांच्या साठी 111 वह्या दिल्या

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार ,नीलम पाटोळे ,दिपाली चौगले ,राजू लोंढे ,उपाध्यक्ष अनुताई दाभाडे ,उत्तम कुंभार, उत्तम पाटील,सुशील जाधव,तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील, हेमंतकुमार पाटोळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना मैलारी व जान्हवी ताटे यांनी केले आभार सुशांत पाटील यांनी मांडले.

गणेशोत्सव शांततेत साजरा करा - पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांचे आवाहन


 हेरले / प्रतिनिधी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन हातकणंगले पोलिस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी केले आहे. 
हेरले (ता. हातकणंगले) येथील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
 पोलीस निरीक्षक के एन पाटील म्हणाले, सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मिरवणूक न काढता पारंपरिक पद्धतीने साजेशी मिरवणूक काढावी, तसेच सामाजिक कार्यासह सजावटीकडे भर द्यावा, सर्व तरुण मंडळांनी एकत्र येऊन एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी, प्रत्येक मंडळाने रितसर परवानगी घ्यावी, कोणत्याही गणेशोत्सव तरुण मंडळाने सक्तीने वर्गणी जमा करु नये, कोणत्याही मंडळाने मंडपची उभारणी रोडवरती करु नये, श्री. चे मूर्तीचे ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक -
अविरत ठेवावे, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बंधुतेचा संदेश द्यावा, जेणेकरून अन्य तरुण मंडळे त्यांचे अनुकरण करतील, यावर्षी महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करुया असे सांगितले होते त्या अनुषंगाने मंडळांनी साऊंड लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या डॉल्बी नियमांस अधिन राहून साऊंड लावावे तसेच सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जबाबदारी ओळखून हा गणेशोत्सव साजरा करावा, गणेश मूर्ती वरील सोन्याचे दागिन्यांची देखभाल करणे करिता मंडळातील स्वयंसेवक नेमावेत व जास्तीत जास्त C.C.TV कॅमेरे बसवावेत, विद्युत रोषणाई बाबत एम.एस. ई.बी. यांचेकडून योग्य ती रीतसर परवानगी घ्यावे असे त्यांनी आवाहन केले. यावेळी हेरले परिसरातील सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यकर्ते, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, 17 August 2022

जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हेरले या नुतन पतसंस्थेचा शुभारंभ

हेरले / प्रतिनिधी
हेरले गावांमध्ये जनकल्याणासाठीच या संस्थेची स्थापना झाली आहे. या जनकल्याण पतसंस्था रूपी छोट्या रोपट्याचे ग्रामस्थ व सभासद आदी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षात निश्चीत  रूपातंर होईल असे मत माजी सभापती राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
  हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हेरले या नुतन पतसंस्थेचे उद्घाटन माजी सभापती राजेश पाटील व संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब यांच्याहस्ते संपन्न झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
 उद्घाटन  प्रसंगी कार्यक्रमाचेअध्यक्ष माजी सभापती राजेश पाटील ,या संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब,माजी उपसभापती  अशोक मुंडे, प्रा. राजगोंड पाटील,  संस्थेचे चेअरमन निलोफर खतीब, व्हा चेअरमन विजय भोसले,छत्रपती शिवाजी सहकारी सोसायटीचे चेअरमन  उदय चौगुले, व्हाईस चेअरमन  कपिल भोसले, सुनील खोचगे, जनकल्याण पतसंस्थेचे संचालक  संजय खाबडे, नितीन परमाज,  रमजान देसाई,  समीर नायकवडी,  जाफर बिचकते, राजकुमार चौगुले, अर्चना कोळेकर, प्रशांत माळी,  हबीब मिर्झाई,   आदी मान्यवररासह गावातील नागरिक, संस्थेचे सभासद उपस्थित होते.
     फोटो 
हेरले : जनकल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हेरले या नुतन पतसंस्थेचे उद्घाटन करतांना माजी सभापती राजेश पाटील व संस्थेचे मार्गदर्शक सपोनि अस्लम खतीब व अन्य मान्यवर

Monday, 15 August 2022

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने राजर्षी शाहू विद्यालय कसबा बावडा परिसरात डेंगू मलेरिया पथनाट्य सादरीकरण

कोल्हापूर प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित म न पा राजर्षी  शाहू विद्या मंदिर कसबा बावडा मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई यांच्या प्रेरणेने शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजित कुमार पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमर महोत्सवादिनानिमित्त डेंगू मलेरियावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी कसबा बावडा परिसरात भगतसिंग वसाहत, मातंग वसाहत, मार्केट यार्ड या भागात 15 ऑगस्ट रोजी पथनाट्य सादर केले पथनाट्य मध्ये डेंगू मलेरिया का होतो व कसा होतो यावर खबरदारीचे उपाय म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी हे या पथनाट्यद्वारे सांगण्यात आले पद नाट्य मध्ये
 येता तापाची कणकण भेटा डॉक्टरांना चटकन, दुपारी झोपताना अंग भरून कपडे घालावेत, स्वच्छता राखावी, पाण्याची खड्डे मुजवावीत, गप्पी मासे पाळावे, उलट्या जुलाब होत असताना डॉक्टरांना भेटावे, रक्तांची तपासणी करून घ्यावी अशा प्रकारचे उपाय योजना सांगून समाज जागृती चे काम करण्यात आले.
 कसबा बावडा आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सोनाक्षी पाटील यांनी विद्यार्थिनींचे पथनाट्य केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी डेंगू मलेरियाबद्दल सावधानता बाळगावी असे पथनाट्यात आवाहन केले पथनाट्य साठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,राजेंद्र चोगले,दीपाली चौगले,तसेच शाळेतील  उत्तम कुंभार ,सुशील जाधव उत्तम पाटील, तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील ,कल्पना पाटील ,हेमंत कुमार पटोळे, सुशांत पाटील, श्लोक गोसावी यांनी सहकार्य केले व कल्पना मैलारी, जानवी ताटे यांनी आभार मानले.

Friday, 12 August 2022

तरुणांच्या पंखांना बळ देण्यासाठी शाहू ग्रुप सदैव कटिबद्ध : समरजितसिंह घाटगे


  मुरगुड येथे  सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप


कोल्हापूर / प्रतिनिधी

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशा तरुणांच्या पंखात बळ भरण्यासाठी, हाताला काम देण्यासाठी शाहू ग्रुप सदैव कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी केले
     शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे  यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.
     यावेळी गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.प्रसंगी कोजिमाशिचे नूतन संचालक बाळ डेळेकर,अविनाश चौगले यांच्यासह निशांत जाधव,विजय गोधडे आदींचा सत्कार केला.
    श्री घाटगे  पुढे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे. परप्रांतीयांना बळाच्या जोरावर पर्याय देऊ शकत नाही. त्यासाठी स्थानिक तरुणांनी मेक इन कोल्हापूर सारख्या संकल्पनातून व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. 
    अध्यक्षीय मनोगतात गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह  पाटील म्हणाले, आपल्या वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुलांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार शालेय वयातच करणे आवश्यक आहे. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनचा गरीब -होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.यावेळी मुरगुड विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.पाटील,कोजिमाशिचे संचालक बाळ डेळेकर, अविनाश चौगले,यांनीही मनोगत व्यक्त केले.
   प्रसंगी शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,दत्तामामा खराडे, उपप्राचार्य एस. पी.पाटील, विलास गुरव, बजरंग सोनुले,विश्वजीत पाटील,अमर चौगले, संजय चौगले, प्रविण चौगले, गणेश तोडकर, धोंडीराम माडेकर, आप्पा मेटकर, दत्ता मामा जाधव, विजय गोधडे, आदि मान्यवर उपस्थित होते. 
  स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी केले.प्रास्तविक  माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.सुत्रसंचालन ए. एन. पाटील यांनी तर   निशांत जाधव यांनी आभार 
मानले. 

चौकट
     त्यांनी स्व.राजेंचा संस्कार जोपासला...!

सहकारमहर्षी स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच संस्कार सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सत्कारातून जोपासला आहे. असे गौरवोद्गार श्री. घाटगे यांनी यावेळी काढले.

फोटो
मुरगुड... येथील सानिका फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण प्रसंगी समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, बाळ डेळेकर, दगडू शेणवी, प्राचार्य एस. आर. पाटील.

Wednesday, 10 August 2022

स्वछता राखा, आरोग्य सांभाळा - सचिन चौगले.

कसबा बावडा प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये स्वराज्य महोत्सव अंतर्गत शाळा स्तरावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छता मोहीम करण्यात आली भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सचिन चौगले,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव, हेमंतकुमार पाटोळे उत्तम पाटील,तमेजा मुजावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या सहकाऱ्यांनी शालेय परिसर स्वच्छता करण्यात आला त्यामध्ये स्वच्छतेचे महत्व उत्तम कुंभार सर यांनी सांगितले हेमंत कुमार पाटोळे यांनी प्लास्टिकचा कचरा विल्हेवाट कसा लावावा त्याचे दुष्परिणाम कसे आहेत हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. 
सचिन चौगले भरतवीर मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वच्छतेचा मंत्र महात्मा गांधी काळापासून दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे असे समजावून सांगितले महात्मा गांधींचे विचार आजही देशाला व समाजाला उपयोगाचे आहेत असे मनोगत व्यक्त केले सचिन चौगले यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी केले आभार सुशांत पाटील यांनी मानले.

Saturday, 6 August 2022

निपुण भारताच्या धोरणास न्याय देण्याचे कार्य शिक्षक करत आहेत - - केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील


दि 29 कसबा बावडा प्रतिनिधी 

 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचलित मनपा राजश्री शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा व जीवन कल्याण विद्यालय हॉल मध्ये निपुण भारत उद्बोधन कार्यशाळा संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ अजितकुमार पाटील होते.
कसबा बावड्यामध्ये केंद्रस्तरीय कार्यशाळेस रोपास पाणी घालून सुरुवात करण्यात आली.शिवराज नलवडे ,विजय माळी, सुनिता कांबळे ,जे जे पाटील,अर्चना पाटील,विजय कुरणे,अमित परीट,दत्तात्रय डांगरे, छाया पवार ,जे जे पाटील,रोहिणी शेवाळे, टी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले पहिल्या सत्रात व प्रास्ताविक मध्ये डॉ अजितकुमार पाटील यांनी निपुण भारत जीआर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान यामध्ये त्यांनी
"  विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत त्यांचा सर्वाधिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामग जबाबदारी आहे भारत सरकार च्या निपुण भारत हा राज्यात इयत्ता पहिली ते येणारे मुलांसाठी पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी साठी राबवण्यात येत आहे मिळावे घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य,भाषिक भाषा विकास उच्चार शास्त्राची जाणीव सांकेतिक भाषा शब्द संग्रह वाचन व आकलन वाचनातील  लेखन ,वाचन संस्कृती तसेच पायाभूत संख्या ज्ञान ,संख्या  व संख्यावरील क्रिया गणना करणे ,आकार व अवकाश समजावून घेणे यासाठी समावेशित शिक्षणा ची सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन हे उपक्रम राज्यातील तीन ते नऊ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे याची अंमलबजावणी शिक्षकांनी करून शैक्षणिक धोरण 2020 ला न्याय द्यायचं काम शिक्षकांनी करायचं आहे, असे प्रतिपादन केले
 शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक  उन्नती शिरोळकर, शितल भांगरे, शिवशंभू गाटे, विराप्पा हाके,साताप्पा पाटील, प्रदीप जानकर यांनी दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले .उद्बोधन वर्गास प्राथमिक शिक्षण समिती,कोल्हापूर चे समन्वयक राजेंद्र अप्पूगडे यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जानकर व टी आर पाटील यांनी केले.निपुण भारत प्रतिज्ञा वाचन सहदेव शिंदे व विराप्पा हाके यांनी केले, आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले.शिक्षण कार्यशाळेमध्ये 76 शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.

Tuesday, 2 August 2022

भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम

 
       अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम
                              तथा  
                  ए. पी. जे. अब्दुल कलाम
      (भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता)

 

       जन्म : १५ ऑक्टोबर १९३१
                *(रामेश्वर)*
       मृत्यू : २७ जुलै २०१५
                *(शिलाँग)*
सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण
                   कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य 
लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

🚀 * कार्य * 🛰
                १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 📚 शिक्षण
             त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 ♦ स्वभाव
    विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
 
🥇 गौरव
                    अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
 
 निधन
               ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
        🇮🇳  *जयहिंद*  🇮🇳

संग्राहक- लेखक - डॉ. ए. पी. सर, कोल्हापूर