कोल्हापूर प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित म न पा राजर्षी शाहू विद्या मंदिर कसबा बावडा मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाधिकारी डी सी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई यांच्या प्रेरणेने शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजित कुमार पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमर महोत्सवादिनानिमित्त डेंगू मलेरियावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी कसबा बावडा परिसरात भगतसिंग वसाहत, मातंग वसाहत, मार्केट यार्ड या भागात 15 ऑगस्ट रोजी पथनाट्य सादर केले पथनाट्य मध्ये डेंगू मलेरिया का होतो व कसा होतो यावर खबरदारीचे उपाय म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी हे या पथनाट्यद्वारे सांगण्यात आले पद नाट्य मध्ये
येता तापाची कणकण भेटा डॉक्टरांना चटकन, दुपारी झोपताना अंग भरून कपडे घालावेत, स्वच्छता राखावी, पाण्याची खड्डे मुजवावीत, गप्पी मासे पाळावे, उलट्या जुलाब होत असताना डॉक्टरांना भेटावे, रक्तांची तपासणी करून घ्यावी अशा प्रकारचे उपाय योजना सांगून समाज जागृती चे काम करण्यात आले.
कसबा बावडा आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सोनाक्षी पाटील यांनी विद्यार्थिनींचे पथनाट्य केल्याबद्दल अभिनंदन केले तसेच शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी डेंगू मलेरियाबद्दल सावधानता बाळगावी असे पथनाट्यात आवाहन केले पथनाट्य साठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,राजेंद्र चोगले,दीपाली चौगले,तसेच शाळेतील उत्तम कुंभार ,सुशील जाधव उत्तम पाटील, तमेजा मुजावर, आसमा तांबोळी, विद्या पाटील ,कल्पना पाटील ,हेमंत कुमार पटोळे, सुशांत पाटील, श्लोक गोसावी यांनी सहकार्य केले व कल्पना मैलारी, जानवी ताटे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment