मुरगुड येथे सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर / प्रतिनिधी
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशा तरुणांच्या पंखात बळ भरण्यासाठी, हाताला काम देण्यासाठी शाहू ग्रुप सदैव कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले
शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त सानिका स्पोर्टस फाऊंडेशनमार्फत मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.
यावेळी गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.प्रसंगी कोजिमाशिचे नूतन संचालक बाळ डेळेकर,अविनाश चौगले यांच्यासह निशांत जाधव,विजय गोधडे आदींचा सत्कार केला.
श्री घाटगे पुढे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे. परप्रांतीयांना बळाच्या जोरावर पर्याय देऊ शकत नाही. त्यासाठी स्थानिक तरुणांनी मेक इन कोल्हापूर सारख्या संकल्पनातून व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.
अध्यक्षीय मनोगतात गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले, आपल्या वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुलांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार शालेय वयातच करणे आवश्यक आहे. सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनचा गरीब -होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.यावेळी मुरगुड विद्यालयाचे प्राचार्य एस.आर.पाटील,कोजिमाशिचे संचालक बाळ डेळेकर, अविनाश चौगले,यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रसंगी शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,दत्तामामा खराडे, उपप्राचार्य एस. पी.पाटील, विलास गुरव, बजरंग सोनुले,विश्वजीत पाटील,अमर चौगले, संजय चौगले, प्रविण चौगले, गणेश तोडकर, धोंडीराम माडेकर, आप्पा मेटकर, दत्ता मामा जाधव, विजय गोधडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वागत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी केले.प्रास्तविक माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले.सुत्रसंचालन ए. एन. पाटील यांनी तर निशांत जाधव यांनी आभार
मानले.
चौकट
त्यांनी स्व.राजेंचा संस्कार जोपासला...!
सहकारमहर्षी स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच संस्कार सानिका स्पोर्ट्स फाउंडेशनने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सत्कारातून जोपासला आहे. असे गौरवोद्गार श्री. घाटगे यांनी यावेळी काढले.
फोटो
मुरगुड... येथील सानिका फाउंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण प्रसंगी समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, बाळ डेळेकर, दगडू शेणवी, प्राचार्य एस. आर. पाटील.
No comments:
Post a Comment