राष्ट्रीय पोषण माह सप्ताह अंतर्गत आज शुक्रवार दिनांक 22/09/2022 मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर क्र 11 कसबा बावडा कोल्हापूर येथे पाककृती स्पर्धा घेणेत आल्या. पाककृती साठी फळभाज्या व पालेभाज्या पासून तयार केलेले पदार्थ बनवून आणण्यास सांगितले होते.
या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व पालकांनी नाविन्यपूर्ण पद्धतीचे खाद्यपदार्थ व विद्यार्थ्यांनी स्वतः सजावट करून उस्फुर्त सहभाग नोंदवला. सदर पाककृती स्पर्धेचे परीक्षण नगरसेविका सौ माधुरी लाड मॅडम, गीतांजली ठोंमके,स्नेहल सरगर ,उज्ज्वला चौगले,वैशाली जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील सर, उत्तम कुंभार यांनी मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना मैलारी या विद्यार्थिनीने केले व आभार तमेजा मुजावर यांनी मानले.कार्यक्रमाची तयारी व नियोजन विद्या पाटील व कल्पना पाटील यांनी केले.
पाककला स्पर्धेतील विजेते पालक
रुपाली बडेकर - प्रथम
अनुराधा गायकवाड - द्वीतीय
वैशाली कोरवि- तृतीय
श्रावणी बेळवी- चौथा
संगीता ताटे - पाचवा
No comments:
Post a Comment