Saturday, 24 September 2022

तणावमुक्त जगण्यासाठी निसर्गाची सोबत महत्त्वाची : प्रा. टी. एस. पाटील

600 विद्यार्थ्यांचा समावेश, मंदीर परिसराची स्वच्छता

कोल्हापूर प्रतिनिधी
 
    विकारमुक्त व तणावमुक्त जीवन जगता येण्यासाठी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग नियमाला बांधिल राहून वर्तन करणे गरजेचे आहे. निरोगी शरीर व ज्याचे मन प्रसन्न आहे, तोच आरोग्यसंपन्न होय. सुखासमाधानाच्या दीर्घायुषी जीवनासाठी पर्यावरण वाचवा, असे प्रतिपादन प्रा.टी.एस.पाटील यांनी केले.
       त्या मुरगूड विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने चिमगाव (ता. कागल) येथील चिमकाई देवी मंदिर येथे आयोजित पर्यावरण व समाजसेवा शिबिरप्रसंगी 'निसर्गाचे सान्निध्य हीच आरोग्याची गुरुकिल्ली' या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एस. पी. पाटील होते.
    प्रारंभी दसरा सणाचे औचित्य साधून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रा. एस. एस. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. पी. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. यु. पी. कांबळे, प्रा. एम. ए.बसर्गे,एम.डी.खांटागळे,जे.टी.पवार यांची भाषणे झाली. . यावेळी प्रा. टी. आर. शेळके, व्ही. आर. गडकरी, ए. जी. मुजावर, व्ही. व्ही. कुंभार, एल. के. पाटील, डी. एस. पाटील, आर. सी. कांबळे, राजकुमार हराळे आदी उपस्थित होते. अजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले.. आनंदा मांगोरे यांनी आभार मानले..
फोटो.. 
चिमगाव... येथे पर्यावरण, समाजसेवा क्षेत्र भेट प्रसंगी तुळशी रोपांची लागण करताना उपप्राचार्य एस. पी. पाटील, सौ. टी. एस. पाटील, एम. ए. बोर्गेस आदि.

No comments:

Post a Comment