कागल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या 'शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा ' या पहिल्या पुस्तकास संकल्प फौडेशन तिरपण महागाव ता. गडहिंग्लज यांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी विविध तालुक्यात गरशिक्षणाधिकारी पदावर काम करत असताना विद्यार्थी व शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी विविध नावीन्य पूर्ण उपक्रमांची अमल बजावणी केली आहे. यासाठी त्यांना न्युपाचा २०१५ चा नैशनल इनोव्हेशन अवॉर्ड देखील मिळाला आहे. अशा नावीन्य पूर्ण उपक्रमां ची माहिती त्यानी शैक्षणिक परिवर्तना च्या पाऊल वाटा या पुस्तकात दिली आहे.
संकल्प फौडेशन तिरपण महागाव ता. गडहिंग्लज यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील विविध साहित्यप्रकार समृद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून तसेच साहित्यिकांच्या लेखणीला बळ देण्याच्या उद्देशाने व मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने संकल्प परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सुरु केले आहेत.सध्या काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कोरोनानंतरचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे एका भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती निवड पत्रकाद्वारे संस्थेचे अध्यक्ष युवराज आनंदराव सरनोबत, उपाध्यक्षा सौ. आदिती युवराज सरनोबत तसेच सचिव सौ. वैशाली जयंत मिसाळ यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment