Saturday, 22 October 2022

जय हनुमान दुध संस्थेतर्फे २७ लाख रु . फरक बीलाचे वाटप


हेरले /प्रतिनिधी 

मौजे वडगाव (ता. हातकणगले ) येथील जय हनुमान दुध संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त हातकणंगले तालुक्यामध्ये म्हैस दुधाला उच्चांकी प्रतिलिटर १०रू १० पै . व गाय दुधाला प्रतिलिटर ५ रु प्रमाणे एकूण २७ लाख रुपये रकमेचे वाटप करण्यात आले . इतर दुध संस्थेंच्या तुलनेत उच्चांकी फरकबीलं देणारी सस्था म्हणून सभासदामध्ये आनदाचे वातावरण आहे
               यावेळी संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते संस्थेला उच्चांकी दुध पुरवठा करणारे दुध उत्पादक म्हणून अनुक्रमे श्रीकृष्ण थोरवत ३ लाख पासष्ट हजार सातशे रु ,. शकील हजारी २लाख बेचाळीस हजार आठशे रु ,  राहूल सावंत १ लाख एकतीस हजार एकशे रु ,. तर म्हैस दुध उत्पादकांमध्ये अनुक्रमे लियाकत मुजावर ५९ हजार दोनशे , आनंदा पोवार ४८ हजार , सुरज नायकवडी ४६ हजार दोनशे , इतकी रक्कम  देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला 
                यावेळी चेअरमन सतिश चौगुले म्हणाले की, जय हनुमान दुध संस्थेच्या वतीने गोकूळच्या सर्व योजनांची दुध उत्पादकांना सेवा दिली जाते . संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी व दुध उत्पादकांच्या सहकार्याने अल्पकाळात १३०० लिटर संकलनाचा टप्पा पार केला असून भविष्यात या सर्वाच्या सहकार्याने म्हैस दुध वाढीवर भर देणार आहे असे ते यावेळी म्हणाले .
               योवेळी चेअरमन सतिश चौगुले, व्हा.चेअरमन नेताजी माने, बाळासो थोरवत, जयवंत चौगुले, बाळासो चौगुले, शकील हजारी, श्रीकृष्ण थोरवत, सुनिल सुतार, सुभाष मुसळे ,  अविनाश पाटील, आनंदा थोरवत, सुरज नायकवडी, मलगोंडा चौगुले , यांचेसह दुध उत्पादक सभासद , कर्मचारी , पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते . स्वागत संस्थेचे सचिव आण्णासो पाटील यांनी केले . प्रास्ताविक महादेव शिंदे यांनी केले तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले .

फोटो 
 जय हनुमान दुध संस्थेच्या वतीने संस्थेला उच्चांकी दुध पुरवठा करणारे दुध उत्पादक श्रीकृष्ण थोरवत यांना फरक बीलाचा धनादेश देताना संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर

Friday, 21 October 2022

आदर्शअधिकारी,शिक्षक,सेवक व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा शिक्षक संघाकडून सत्कार


कोल्हापूर दि.१९-१०-२०२२ 
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शहर शाखा कोल्हापूरच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित *आदर्श शिक्षक-सेवक व स्कॉलरशिपप्राप्त विद्यार्थी सत्कार सोहळ्यात* कोल्हापूर मनपा शिक्षकांचे कार्य कौतुकासाद असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षक संघाचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक  *मा.श्री राजाराम वरुटे* यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका शाळांच्या गुणवत्तेचा डंका राज्यात वाजतोय आणि गाजतोय याचे संपूर्ण श्रेय  प्रशासन-शिक्षक- सेवक विद्यार्थी आणि पालक यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
 राज्य कोषाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल *मा.श्री. संभाजी बापट* यांचा सत्कार करणेत आला, यावेळी मनपा शाळांचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे मत त्यांनी मांडले.
 संपूर्ण शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण बनवण्याचे आपले ध्येय असल्याचे मत *प्रशासनाधिकारी मा.श्री. डी. सी. कुंभार* यांनी व्यक्त कोले.
  शिक्षक संघाचे शहराध्यक्ष *श्री.राजेंद्र पाटील* यांनी  हृदयस्पर्शी व तडफदार भाषणाने सर्वांची मने जिंकली. 
यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षक *श्री.विजय माळी व श्री.बाळासाहेब कांबळे* उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री.बजरंग लगारे व *Kop माझा न्युज* चे *श्री.राजेंद्र कोरे* कार्यक्रमास उपस्थित होते. 
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक, सेवक, अधिकारी व शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी अशा  जवळपास १६० गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

 आदर्श पटवाढ शाळा ल.कृ.जरग विद्यामंदिर, हिंद विद्यामंदिर व रावबा विचारे विद्यालय या शाळांतील स्टाफचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

 तहसिलदार मा.श्री.स्वरूप कंकाळ यांचे दिवंगत पत्नीचे स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात आल्या.

 याप्रसंगी  सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष. श्री.व.प.चव्हाण, श्री.बरगे, महिला आघाडी प्रमुख सौ. वैशाली अ-पाटील, श्रीम.आशालता खाडे, महिला संघटक श्रीम.जयश्री कांबळे, कोषाध्यक्ष विजय सुतार, उपाध्यक्ष कमलाकर काटे, सुनिल कुरणे ,किरण पाडळकर, साताप्पा पाटील, सुभाष मराठे, नेताजी फराकटे, अमित जाधव संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते  पुरस्कार प्राप्त शिक्षक,सेवक ,विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 
 कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. सारिका पाटील व श्री.संतोष  मोरमारे यांनी केले. प्रास्ताविक सरचिटणीस श्री.दिलीप माने  यांनी तर राज्यप्रतिनिधी अजितकुमार पाटील यांनी आभार मानले.

Thursday, 20 October 2022

छत्रपती सोसायटीच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप



    हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता हातकणंगले)येथील छत्रपती शिवाजी विकास सेवा सोसायटीच्या वतीने दिवाळीचे औचित्य साधून २०२० ते २१ सालचे ५ टक्केप्रमाणे सभासदांना लाभांश वाटप व तेल, बाटली,साबण व उटणे याचे वाटप करण्यात आले.हे वाटप मार्गदर्शक संचालक माजी सभापती  राजेश पाटील,चेअरमन उदय चौगुले,जेष्ठ संचालक अशोक मुंडे ,शशिकांत पाटील,राजेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सचिव नंदकुमार माने, रवी मिरजे आदीसह संचालक, सभासद उपस्थित होते.
     फोटो 
हेरले येथे मार्गदर्शक संचालक माजी सभापती  राजेश पाटील यांच्या हस्ते सभासदांना लाभांश व दिपावली भेट  सभासदांना वाटप करतांना शेजारी चेअरमन उदय चौगुले,जेष्ठ संचालक अशोक मुंडे ,शशिकांत पाटील,राजेंद्र कदम आदी मान्यवर.

Wednesday, 19 October 2022

लोकसहभाग हा आपत्ती व्यवस्थापनाचा आत्मा आहे - दौलत देसाई

हेरले प्रतिनिधी
आपत्तीच्या काळात लोक सहभागाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. याबद्दलची जाणीव जागृती नागरिकांमध्ये करून क्षमता बांधणी केली तर नागरिक कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहतील. आपत्ती काळात जीवित हानी टाळायची असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि तो आपत्ती व्यवस्थापनाचा आत्मा आहे, असे उद्गार माजी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाचे माजी आपत्ती व्यवस्थापन संचालक दौलत देसाई यांनी संजय घोडावत विद्यापीठातील आपत्ती व्यवस्थापन या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत काढले. त्याचबरोबर कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आलेल्या महापूर व कोव्हिडं 19 आपत्तीच्यावेळी जनतेने केलेल्या सहकार्यामुळे या आपत्तीचा चांगल्या प्रकारे आपण  सामना करू शकलो असे नमूद करून कोल्हापूरच्या नागरिकांचे त्यांनी यावेळी आभारही मानले.
   कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते. अशावेळी शासन आणि जनता यांनी एकत्र येऊन सुयोग्य व्यवस्थापन केले तर त्यातून जीवित हानी टाळता येऊ शकते. कोल्हापुरातील महापूर आणि कोविड काळात कार्य करत असताना शासकीय अधिकारी म्हणून कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, त्यातून कशाप्रकारे मार्ग काढला याबद्दल त्यांनी कार्यशाळेत उहापोह केला. आपल्या अनुभवाचा फायदा कार्यशाळेतील सहभागीतांना व्हावा यासाठी अनेक उदाहरणातून त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. यासाठी त्यांनी भारत सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याविषयीची माहिती दिली.
संजय घोडावत समूह आणि विद्यापीठाच्याद्वारे महापूर व कोविड काळात कोल्हापूर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी समूहाचे चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या बद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. अन्नधान्याचे वाटप असो, रुग्णांची सेवा असो या काळात घोडावत समूह सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. त्यांनी केलेले हे कार्य इतर संस्थांसाठी मार्गदर्शक आहे. सर्वांनी अशा कार्यासाठी तत्पर असायला हवे तरच आपत्तीच्या काळात शासन, सामाजिक संस्था, आणि लोकसहभागातून उत्तम व्यवस्थापकीय कार्य घडू शकेल.
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ,एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठात करण्यात आले आहे. यावेळी दौलत देसाई यांचा सत्कार स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील आणि टीसाईड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सायमन लिंच यांनी केले.तर हि कार्यशाळा २१ ओक्टोबर पर्यंत चालणार असल्याची माहिती समन्वयक प्रा. इंगळे यांनी दिली

Monday, 17 October 2022

पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी वाढते संजय घोडावत यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान


हेरले प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील उद्योजक संजय घोडावत यांना ‘जय आनंद ग्रुप’ तर्फे यावर्षीचा ‘समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे घोडावत यांनी लोक कल्याणाचा आदर्श सामाजिक उपक्रमाद्वारे पुढे नेला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा पुरस्कार देऊन करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते असे ते यावेळी म्हणाले. 
बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शांतिलाल मुथ्था, वरिष्ठ पोलीस अधिकारी आयजी मनोज लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. झेडएफ स्टीअरिंग गिअर इंडिया लिमिटेड के चेअरमन दिनेश मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पुरस्कार मिळाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना संजय घोडावत यांनी आपल्या आयुष्याचा आणि संघर्षाचा प्रवास मांडला. ‘पुरस्कार मिळाला असला तरी आपल्या एकूण स्वप्नांपैकी फक्त 0.5% कार्य आपल्या हातून झाले आहे, अजून बरीच भरारी घ्यायची आहे’, असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. घोडावत म्हणाले, ‘जय आणि आनंद’ हे दोन्ही शब्द किंवा या दोन्ही भावना फार महत्त्वाच्या असतात. ‘जय आनंद ग्रुप’ ने दिलेल्या या सन्मानामध्ये या दोन्ही भावना अंतर्भूत आहेत. ज्यामधून रोजगार निर्मिती होते, तो उद्योग करायला हवा’, असा आपला विचार असल्याचेही घोडावत म्हणाले.
‘सेवा करणे आणि सेवा करणाऱ्यांचा सन्मान करणे, या दोन्ही गोष्टी आनंद देणाऱ्या असतात. ‘जय आनंद ग्रुप’ ने आपल्या पुरस्कारांच्या माध्यमातून चांगल्या कार्यालाच प्रतिष्ठित केले आहे’, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हुकमचंद सावला यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘जीवनातील आनंद हा दान देण्यामध्ये असतो. ‘जैनीजम इज विजन ऑफ लाईफ’ अशी व्याख्या त्यांनी सांगितली. मनुष्य जन्माचे बीज हे संस्कार असते, असे ते म्हणाले. ‘सेवा के पथ पर आगे   होगा’, असा संदेश देत सावला यांनी भाषणाचा समारोप केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था म्हणाले, ‘सन्मान करण्यामागील हेतू हा सन्मानर्थींच्या जीवनप्रवासामधून उपस्थितांना काहीतरी शिकायला मिळावे, असा असतो. मूल्यांसह प्रगती करणे याला खूप महत्त्व आहे. स्वतःची इच्छा आणि व्यवसाय यांच्यात संतुलन साधता आले पाहिजे, ते संजय घोडावत यांनी करून दाखवले आहे. या पुरस्कार सोहळ्यामुळे ‘जय आनंद ग्रुप’ चा सन्मान वाढला आहे’.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आयजी मनोज लोहिया म्हणाले, ‘जैन समाजातर्फे अनेक प्रकारची सामाजिक कार्य केली जातात. या कार्यांमुळे मी प्रभावित होत आलो आहे. आपण एकमेकांना मदत करायला हवी हा आत्मिक आवाज आहे. अशा कार्यक्रमांतून इतरांना प्रेरणा मिळणार आहे’.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश मुनोत यांनी उद्योग जगत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पट उपस्थितांसमोर मांडत, त्या विषयावर भाष्य केले. मुनोत म्हणाले, ‘पुढील दोन दशके भारताची असतील. जग भारताकडे आशेने पाहत आहे. पुढील पिढीला आपण पंख प्रदान करायला हवेत, जेणेकरून ते मनासारखी भरारी घेऊ शकतील. जैन धर्माबद्दल असलेल्या आस्था या आपण लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात. त्यासाठी चांगला संवाद घडायला हवा. जैन मूल्ये ही केवळ एखाद्या परिवारापुरती सीमित न ठेवता सर्वात शक्तिशाली माध्यमातून ती जगभर पोहोचवायला हवीत’, अशी अपेक्षा दिनेश मुनोत यांनी व्यक्त केली.
आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा. आणि आचार्य श्री तुलसीजी आदि संत-सती वृंद यांच्या मंगल आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रुपचे कार्याध्यक्ष अनिल लुंकड यांनी सूत्रसंचालन केले तर गणेश कटारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले

आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण काळाची गरज: जिल्हाधिकारी रेखावारसंजय घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन


हेरले प्रतिनिधी

 कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकार महत्त्वाची भूमिका बजावत असते. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश आपत्कालीन विभागाकडून देण्यात येतात. नागरिकांना अशा परिस्थितीत काय करावे कळत नाही. या काळात मानव, प्राणी यांचे जीव वाचवणे गरजेचे असते. परंतु प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी यांची तुलनेने संख्या कमी असल्यामुळे व या विषयाचे शिक्षण नसल्यामुळे मर्यादा येतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण ही काळाची गरज आहे. पदवी आणि पदव्युत्तर विभागात हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाल्यास नागरिकांचा जीव वाचण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संजय घोडावत विद्यापीठातील आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ,एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, टीसाईड विद्यापीठचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ. सायमन लिंच, डॉ.केविन थॉमस, एस.आर.एम.विद्यापीठाचे डॉ.विघ्नेश के.एस, घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कि आपत्कालीन काळात कोणाचाही जीव वाचवणे खूप गरजेचे असते. यासाठी सार्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पाच दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांनी या विषयाचे उत्तम शिक्षण घेण्यासाठी तयार व्हावे. तुम्ही एका चंगल्या कार्यशाळेत सहभाग घेतल्याचे सांगत, समाधान व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्याविषयी सांगताना ते म्हणाले, कि हा जिल्हा देशालील सर्व राज्यात एक समृद्ध जिल्हा आहे.परंतु येथे काही वार्षापासून आपत्कालीन परिस्थिती उद्भवत आहे. यावर मात करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि शिक्षण गरजेचे आहे. यासाठी अनुदान देणाऱ्या ब्रिटीश कौन्सिल चे आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यापिठांचे त्यंनी कौतुक केले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी उपस्थित सर्व अतिथी मार्गदर्शकांचे, सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशाविषयी संगितले. याचा उद्देश 'प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा' असा असून, या माध्यमातून टीसाईड विद्यापीठ युके येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, सहभागी शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
टीसाईड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सायमन लिंच याप्रसंगी बोलताना म्हणाले, कि मागील वर्षापासून या कार्यशाळेसाठी आमचे प्रयत्न सुरु होते. ब्रिटिश कौन्सिल व घोडावत विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतल्याने हि कार्यशाळा पार पडत असल्याचे समाधान व्यक्त केले. जर सहभागी विद्यापीठांनी या संधीचा चांगल्याप्रकारे फायदा करून घेतला तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या करियरसाठी याचा नक्कीच उपयोग होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांनी हवामान बदलामुळे आपत्कालीन परिस्थितीचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यातून बचाव करण्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगत संजय घोडावत फौंडेशनन व विद्यापीठाने आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या सामाजिक कार्याची सर्वाना ओळख करून दिली. लोकांनी आपल्याला नेहमी चांगल्या कार्यासाठी लक्षात ठेवायला हवे असे कार्य विद्यार्थ्यांनी करावे असा उपदेश दिला.
या कार्यशाळेसाठी महत्वाचा दूवा म्हणून कार्य करणारे शैक्षणिक सल्लागार आनंद हंदूर व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिटिश हाय कमिशन गव्हर्मेंट ऑफ युके चे शौभीक गांगुली, घोडावत विद्यापीठातील सर्व अधिव्याख्याते, ६० हून अधिक प्रशिक्षणार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोहम तिवडे यांनी मानले.

Sunday, 16 October 2022

घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन



हेरले / प्रतिनिधी

डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ, एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान 'प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा' या उप विषयावर आधारित आहे.
आपत्ती व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रशिक्षकांना उत्तम प्रशिक्षण मिळावे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून एम.एस.सी डीझास्टर ममॅनेजमेंट विषयाचा अभ्यासक्रम सहभागी विद्यापीठाच्या शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर, प्रशिक्षकांच्या सल्ल्याने तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहभागी विद्यापीठाच्या निवडक विद्यार्थ्यांना टीसाईड विद्यापीठ युके आणि भारतात एम.एस.सी डीझास्टर ममॅनेजमेंट या विषयाचे शिक्षण घेण्याची आणि १२ आठवड्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याचा सर्वतोपरी खर्च विद्यापीठाचा असणार आहे. ज्याच्यामध्ये प्रवास खर्च, राहण्याची सोय आहे. संजय घोडावत विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ब्रिटिश कौन्सिल कडून देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यामुळे भारत आणि युके यांच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची देवाणघेवाण सुरु होईल. हा अभ्याक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्र, राज्य, जिल्हा आपत्कालीन विभाग, स्वयंसेवी संस्था अशा ठिकाणी नोकरी करण्याची संधी प्राप्त होईल.
प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थी आणि प्रशिक्षक कोल्हापूर आणि परिसरातील ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती  निर्माण होते तिथे भेटी देणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरातील वारसा स्थळांना भेट देऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करता येईल या विषयी, यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. देश विदेशातील 60 हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्रशिक्षक या कार्यशाळेत सहभाग घेणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी दिली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता घोडावत विद्यापीठात होणार आहे. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राहुल रेखावार तर अध्यक्ष म्हणून विश्वस्त विनायक भोसले उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर टीसाईड विद्यापीठ चे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सिमॉन लॅँच आणि डॉ.केविन थॉमस या उद्घाटन समारंभास अतिथी प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यशाळेत घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, डिझाईन सल्लागार दीपंकर भट्टाचार्य, एस.आर.एम.विद्यापीठाचे डॉ.विघ्नेश के.एस.,महाराष्ट्र राज्याचे माजी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि माजी जिल्हाधिकारी  दौलत देसाई, सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ज्ञ आशुतोष कापसे, शास्त्रज्ञ एस.डी.पवार, व्हाईटवॉटर आर्किटेक्ट चे प्राचार्य आर्कि. दर्शन इंदानी, सी.डी.आर.आय व्यवस्थापन शाखेचे अविनाश व्यंकटा हे सर्व व्याख्याते सहभागीतांना प्रशिक्षण देणार आहेत. या कार्यशाळेस संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Saturday, 15 October 2022

राजर्षी शाहू विद्यामंदिर कसबा बावडा मध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन माननीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची वाचन प्रेरणा दिन जयंती निमित्त साजरी करण्यात आली. साईराज दाभाडे या विद्यार्थ्यांनी सायकल पुढारी पेपर फेरी वाचण्यात काढण्यात आली .इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांची मराठी हिंदी इंग्रजी वाचन स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
विद्यार्थी आयुष केंगार व आदिती बिरणगे, प्रणित पाटील यांनी दैनिक पुढारी वृत्तपत्र याचे वाचन केले.
 शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉअजितकुमार पाटील यांनी मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त चिंतन पर व उपदेश पर मौलिक विचार मांडले .
साईराज दाभाडे व आयुष केंगार या विद्यार्थ्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची वेशभूषा परिधान केली होती ज्येष्ठ शिक्षक उत्तम कुंभार सुशील जाधव विद्या पाटील आसमा तांबोळी उत्तम पाटील मिनाज मुल्ला यांनी कार्यक्रम संपन्नतेसाठी विशेष सहकार्य केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार व इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रणित पाटील या विद्यार्थ्याने मांडले

Tuesday, 11 October 2022

प्रयत्न, परिश्रम, चिकाटी, आत्मविश्वास हीच यशाची चतुःसुत्री - जीवन साळोखे

नरंदे विद्यालयात शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला

हातकणंगले प्रतिनिधी

"प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्याचा हक्क आहे. त्यासाठी कठोर परिश्रम,प्रयत्नातील सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास या चतुःसुत्रीचा वापर  केला पाहिजे. स्वतःच्या क्षमता ओळखून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आळस आणि कामचुकारपणा हे विद्यार्थी जीवनात नेहमीच शत्रू आहेत, हे समजून सक्रिय झाले पाहिजे. " असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले. 
   ते स्व.शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत,नागनाथ शिक्षण संस्थेच्या नरंदे हायस्कूल नरंदे (ता.हातकणंगले ) येथे "यशस्वी होण्याचा राजमार्ग" या विषयावर  बोलत होते. यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी नमिता देशमुख या अध्यक्षस्थानी होत्या.

   आपल्या भाषणात जीवन साळोखे पुढे म्हणाले,विद्यार्थी जीवनापासून यशस्वी होण्यासाठी ध्येय प्राप्तीचा ध्यास घेतला पाहिजे. योग्य दिशेने,सकारात्मक द्रुष्ट्या  सतत प्रयत्न आणि परीश्रम  केले तर , अशक्य काहीच नाही. तुमच्यातील
 कार्यक्षमता आणि गुणवत्ता या तुम्हाला वेळोवेळी कसोटीवर सिद्ध केल्या पाहिजेत. त्या बढाई मारण्याच्या गोष्टी नाहीत."
      यावेळी आपल्या भाषणात वाचनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी वाचते होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करून, प्राचार्य जीवन साळोखे यांनी आपल्या "ग्रंथदान उपक्रमांतर्गत" हायस्कूलच्या शालेय ग्रंथालयास पंधराशे रु.ची पुस्तके भेट दिली.
   प्रारंभी पर्यवेक्षिका सौ.एस.एस.निकम  यांनी स्वागत, मुख्याध्यापक बी.एस,खोत यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सुस्मिता शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुरेश गावडे यांनी समारोप केला.

                             ◆◆

Wednesday, 5 October 2022

सामुदायिक महाकुंकूमार्चन उपासना सोहळा संपन्न

हेरले / प्रतिनिधी

 हिंदू युवा संघटना यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे नवदुर्गा महोत्सवानिमित्त प्रथमच सुवासिनींच्यासाठी सकल सौभाग्यदायी, महाकुंकूमार्चन उपासना सोहळा, हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशक मूर्ती निमित्त आयोजित करण्यात आला होता. श्री दुर्गा देवी नमः हा जप एक हजार आठ वेळा म्हणून सर्व  सुवासिनींनी महाकुंकू मार्चन उपासना केली. यावेळी हिंदू जनजागृती संघटनेच्या  सौ.साधना गोडसे व सुजाता लोहार यांनी सुहासिनींना मार्गदर्शन केले  व माहिती सांगितली. यावेळी जवळ जवळ पाचशेहून अधिक सुहासिनीनी सहभाग नोंदवला होता. यावेळी मोफत साहित्य, वाटप करण्यात आले होते . कार्यक्रमाची सांगता नवदुर्गेच्या आरतीने केली . यावेळी हिंदू युवा संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.