हेरले (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत तिरंगी लढत होऊन माजी सभापती राजेश पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी
ग्रामविकास आघाडीचे सरपंच उमेदवार राहुल महावीर शेटे यांनी राजर्षी छ. शाहु ग्रामविकास आघाडीचे
महमंदबख्तियार बालेचाँद जमादार यांच्यावर अटीतटीच्या लढतीत १३ मतांनी विजय संपादन केला.
या विजयासह स्वाभिमानी शेतकरी
ग्रामविकास आघाडीचे सरपंचपदासह ६ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले.
माजी सभापती राजेश पाटील,माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, मुनीर जमादार, प्रा. राजगोंड पाटील, माजी उपसभापती अशोक मुंडे, कपिल भोसले यांनी आघाडीचे नेतृत्व करीत निवडणुक हाताळली.
माजी सरपंच बालेचाँद जमादार व जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छ. शाहु ग्रामविकास आघाडीचे ११ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.
माजी ग्रामपंचायत सदस्य अमरसिंह वड्ड यांच्या नेतृत्वाखाली युवा लोकजनशक्ती गाव विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार स्वतः होते. त्यांनी पॅनेल करून तिरंगी लढत दिली. मात्र त्यांना स्वतःसह सर्वच सतरा जागांवर अपयश आले. मात्र त्यांनी या आघाडीच्या माध्यमातून गावांमध्ये तिसरा पर्याय आहे हे त्यांनी दाखवून दिले.
सरपंचपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते
१)अनिल उपाध्ये - ४४७
२) महमंदबख्तियार जमादार - ३२४३
३) अमर वडु - १०३२
४) राहुल शेटे - ३२५६ - विजयी
५) नोटा - ५८
झालेले एकूण मतदान - ८०३६
विजयी उमेदवार
हिरालाल कृष्णा कुरणे,सुशीला सुभाष परमाज,बानू अस्लम खतीब,मनोज मलगोंडा पाटील,वनिता अशोक खाबडे,रंजना मानसिंग माने,विजय रवींद्र भोसले,गीतांजली सुभाष चौगुले, अर्जुन कृष्णात पाटील, अमीन हिम्मत बारगिर,शुभांगी राहुल चौगुले,राकेश सर्जेराव जाधव,सविता बाळगोंडा पाटील,महमंदबख्तियार बालेचाँद जमादार ,अमित आदगोंडा पाटील,निलोफर इब्राहिम खतीब,उर्मिला प्रकाश कुरणे आदी विजयी झाले.
हेरले गावामध्ये दोन्ही ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.
No comments:
Post a Comment