सुधाकर काशीद यांना जीवनगौरव
डॉ. योगेश जाधव व नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. असोसिएशनच्या विशेष बैठकीत या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ही ग्रामीण भागातील विविध माध्यम समूहांच्या प्रतिनिधींची संघटना आहे. पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा या संघटनेमार्फत विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
दैनिक पुढारीचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात व
प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या हस्ते आणि संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी व बी. न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अतिग्रे ( ता. हातकणंगले ) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहात रविवारी ( ता. ८ जानेवारी ) सकाळी दहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी सांगितले.
सन २०२१ - २०२२ या वर्षासाठी जाहिर झालेले मुख्य पुरस्कार पुढीलप्रमाणे : सुधाकर काशीद
( दै. तरुण भारत ) यांना जीवनगौरव, प्रा. रवींद्र पाटील ( दै. सकाळ ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, मोहसिन मुल्ला ( दै. पुढारी ) यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, दीपक घाटगे ( दै. नवराष्ट्र ) यांना आदर्श आवृत्तीप्रमुख, संतोष बामणे ( दै. पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट सेवा व तानाजी पाटील ( एस. न्यूज ) यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार / कॅमेरामन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
उत्कृष्ट तालूका पत्रकार पुरस्कार पुढील प्रमाणे :
शिरोळ - मनोज शिंदे ( दै. पुढारी ), संतोष तारळे ( दै. लोकनेता ), हातकणंगले - नंदकुमार साळोखे ( दै. तरुण भारत ), शिरीष आवटे ( दै.पुढारी ), आजरा -सचिन चव्हाण ( एसबीएन न्यूज ), भुदरगड - संतोष भोसले ( दै. सकाळ ), गजानन देसाई ( दै. लोकमत ), गडहिंग्लज - रवींद्र हिडदूगी
( दै. लोकमत ), निपाणी - संभाजी माने ( दै. तरुण भारत ), चंदगड - बाबासाहेब मुल्ला ( सा. न्यूज लाईफ ), शाहूवाडी - संजय जगताप ( दै. महासत्ता ), पन्हाळा - रवींद्र पाटील ( दै. पुढारी ) व शिवाजी पाटील ( दै. तरुण भारत ), करवीर - विश्वनाथ गोविंद मोरे ( दै. तरुण भारत ), कागल - कृष्णाजी शेटके ( दै. तरुण भारत ) व राजू चव्हाण ( फोटोग्राफर ), राधानगरी - पी. जी. कांबळे ( दै. तरुण भारत ), गगनबावडा - महादेव कांबळे ( स्पिड न्यूज लाईव्ह २४ )असे आहेत.
यावेळी उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानीस नंदकुमार कुलकर्णी, अतूल मंडपे, रविंद्र पाटील, सतिश पाटील, सुरेश कांबरे आदी उपस्थित होते.
...................................................................................................
No comments:
Post a Comment