हेरले /प्रतिनिधी
हेरले:-
हेरले (ता हातकणंगले) येथे कौतुक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन आजी आजोबा व सस्थापक अध्यक्ष विश्वास पवार व शिंदे सर याचे हस्ते श्रीपळ वाढवून उदघाटन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कौतुक विद्यालयाचे अध्यक्ष विश्वास पवार म्हणाले अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग घेणे आवश्यक आहे.
कौतुक विद्यालयाच्या प्रत्येक इयतेतील मुलांनी पारंपारीक सांस्कृतिक गीत, चित्रपटातील गीतांवर नृत्ये सादर केली, एकपात्री व नाटीकाही सादर केल्या. अत्यंत उत्साहात नृत्यांची परीपूर्ण तयारीने चिमुरड्यांनी नृत्यांचा अविष्कार सादर केला.
या प्रसंगी संचालक शिंदे सुनील भोसले, मुख्याध्यापक ए . एन. पाटील विभाग प्रमुख के. ए. खतीब व शिक्षक शिक्षकेत्तर पालकवर्ग उपस्थित होते.
फोटो
हेरले येथील कौतुक विद्यालयाच्या विदयार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात कला सादर करतांना.
No comments:
Post a Comment