हेरले /प्रतिनिधी
सांगली - कोल्हापूर राज्य मार्गवरील
अतिग्रे ते शिरोली या दरम्यान रस्त्यावरील स्पीड ब्रेकर महामार्ग रस्ते मंडळाने कोणताही गंभीर विचार न करता हटवले आहेत. हेरले ,चोकाक, अतिग्रे, हालोंडी , मौजे वडगाव फाटा या ठिकाणी पादचारी आणि शाळेतील मुलांना रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले आहे. अनेकांचे नाहक बळी जात आहेत, वाहने वेगाने येत असल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.याची दखल कोणीच घेत नाही.खासदार , आमदार ही याबाबतीत उदासीन आहेत. कोणततेही गांभीर्य नाही. दाद मागायची तर कोणाकडे असा प्रश्न या गावातील लोकांना पडला आहे.
यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे कोल्हापूरला येणार आहेत त्यांच्या वाहनांचा ताफा अडविणार आणि आंदोलन करणार , त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही
असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
No comments:
Post a Comment