हेरले / प्रतिनिधी
सांगली - कोल्हापूर राज्य मार्गावरील हेरले (ता.हातकणंगले)येथील देसाईमळ्या जवळच्या ओढ्यावरील पुलाचे संरक्षण कटडे तुटलेले असल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून ओवर टेक करतांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच या ठिकाणी उगवलेल्या झाडवेलींच्या झुडपामुळे तर तुटलेला कटडा दिसतच नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना, वाहन धारकांना प्रवास करीत असतांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या ठिकाणी कटडा बांधावा किंवा पत्र्याचा तट तयार करावा अशी वाहनधारकांच्यातून मागणी होत आहे.
तसेच या मार्गावरील हेरले येथील माळभागावर समर्थ हॉटेल समोरील स्पीड ब्रेकर काढल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना शाळेसाठी ये जा करण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवासी नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे . तरी या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची सोय व्हावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
No comments:
Post a Comment