मुरगूड विद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
कोल्हापूर / प्रतिनिधी
"कायदा मानणारे नागरिक बना.जबाबदारी खांद्यावर घ्यायला शिका.नैतिकतेच्या चौकटीत प्रगती करा.कुटुंबासह गाव देशाचे नाव उज्वल करा. व्यक्ती स्वतःच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो.कायदे प्रिय नागरिक देशाचे आधारस्तंभ असा मौलिक सल्ला कागल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व कागलचे दिवाणी न्यायाधीश बी.डी.गोरे यांनी दिला.
कागल तालुका विधी सेवा समिती, कागल वकील बार असोसिएशन आणि मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मुरगुड विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी न्यायमूर्ती गोरे अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
राष्ट्रीय युवक दिन, बालिका दिवस,राष्ट्रीय मतदाता दिवस, राष्ट्रीय मानवी तस्करी विरोधी जाणीव जागृती दिवस या संयुक्त उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या प्रबोधन शिबिरात विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
अँड. एस बी गुरव म्हणाले," व्यासंगी आणि बुद्धिमान व बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी आपले ज्ञान आणि विज्ञानवादी दृष्टी यामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली. भारताचे कायदे प्रिय आदर्श नागरिक बना. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला मतदार या नात्याने बळकट करा." असा संदेश त्यांनी दिला.
अॅड. ए.एस.शितोळे म्हणाले," समाज माध्यम इंटरनेट जितके सोयीस्कर तितकेच घातक ही आहे.या समाज माध्यमांचा गैर उपयोग करून अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार होतात.शालेय मुलींना 'गुड टच' आणि 'बॅड टच' याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. स्व ची जाणीव असणाऱ्या मुली आणि महिला स्वतःचे रक्षण करू शकतात.त्यांच्यापाठीशी कायदा आणि न्याय सदैव उभा राहतो
सहायक पोलीस निरीक्षक सुनील मळवी यांनी "लहान मुलांनी वाहने चालवू नयेत अपघात ग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.आदर्श नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात.असे मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.आर.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ए.एन.पाटील तर आभार उपप्राचार्य प्रा.एस.पी.पाटील यांनी मानले.
याप्रसंगी मुरगूडचे एपीआय विकास बडवे, उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस.एच निर्मळे, पी.बी.लोकरे,राहुल देसाई,कविता नाईक, अँड जीवन शिंदे,सुधीर सावर्डेकर,गणपती चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो
मुरगुड .. येथील कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन करताना कागल दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.गोरे, मुख्याध्यापक एस.आर.
पाटील एपीआय विकास बडवे,मार्गदर्शक एस.बी.गुरव,ए.एस.शितोळे, सपोनी सुनील मळवी व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment