कोल्हापूर / प्रतिनिधी
सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत माध्यमिक विभागातील सर्व संघटनांची संघटना प्रतिनिधींची बैठक बुधवार १८ रोजी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे आयोजित केली होती.माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस मार्गदर्शन करतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर म्हणाले २० ते २६फेब्रवारी या सात दिनी सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे. सुमंगलम हा पंचमहाभूत लोकोत्सव माध्यमिक शिक्षण विभागामार्फत राज्यात आदर्श ठरेल असा साजरा करण्यामध्ये सहभाग नोंदवू.या कार्यक्रमानिमित्य नियोजनासाठी सर्व संघटना उपस्थित आहेत. आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी संदेशवाहक म्हणून काम करणे गरजेचे आहे.स्वइच्छेने कणेरीमठ परिसरातील स्वयंमसेवक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी कार्य केले पाहिजे,एनसीसी, एमसीसी ,आरएसपी, स्काऊट गाईड विद्यार्थी यांनी कर्तव्ये बजावे, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी १ किलो प्लास्टिक गोळा करणे, तुरडाळ व मुग मुठभर कडधान्ये गोळा करणे, जुन्या स्वच्छ इस्त्री केलेल्या साड्या गोळा करणे, वापरलेले सुस्थीतीत ताट वाटी ग्लास गोळा करणे, शहरामध्ये आठ ते दहा चित्ररथ तयार करावेत, लेझीमपथक, झांझपथक ,ढोलपथक व पथनाट्य यांचे आयोजन करावे , स्वइच्छेने सुशोभिकरणासाठी कला शिक्षकांनी योगदान द्यावे,१२ तालुके २ महानगरपालिकामधील शिक्षकांनी २० ते २६ फेब्रुवारी या सात दिवसामध्ये प्रत्येक दिवशी दोन तालुक्यातील शिक्षकासह विद्यार्थी सहभागी व्हावेत असे आवाहन केले.
स्वागत मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी केले. प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी आर.व्ही. कांबळे यांनी केले. कणेरी मठाचे कार्यवाह प्रल्हाद जाधव यांनी लोकोत्सव सुमंगल कार्यक्रम विषयी सविस्तर माहिती सांगितली. आभार एस. डी. लाड यांनी मानले.
या प्रसंगी शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघ चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, विस्तार अधिकारी अर्चना पाथरे, विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, अर्जुन होणगेकर, मिलींद पांगिरेकर, अजीत रणदिवे, इरफान अन्सारी, दिपक पाटील,अरुण मुजुमदार, जगदीश शिर्के, राजेश वरक, पी. डी. शिंदे ,लिपिक पुनम ठमके आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाचे अध्यक्ष / सचिव उपस्थित होते.
फोटो
शिक्षक शिक्षेकेत्तर संघटनाच्या बैठकीस मार्गदर्शन करतांना माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment