हेरले /प्रतिनिधी
हेरले (ता हातकणंगले) सुर्यगंगा कला, क्रीडा व सांस्कृतीक मंडळ प्रणित संकल्प सिद्धी गणेश मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्त झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६३ जणांनी रक्तदान केले.गणेश जयंती निमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ ५ हजार ग्रामस्थांनी घेतला.
गणेश जयंती निमित्त 'श्री'ची नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
सकाळी गणेश जन्मकाळ सोहळा ,यज्ञ विधी,संस्कार व पूर्णाहुती काशीनाथ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आली.महाआरती लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे व शिवाजी रुईकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप आनंदा कुंभार व गुरुनाथ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर,माजी सभापती राजेश पाटील,सरचिटणीस मुनिर जमादार, युवा नेते रोहन पाटील, पोलीस पाटील नयन पाटील,उपसरपंच महंमदबख्तियार जमादार, ग्रा सदस्य अमित पाटील,पंचगंगा साखर संचालक लक्ष्मण निंबाळकर,अध्यक्ष शशिकांत पाटील,उपाध्यक्ष नारायण चौगुले व सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment