हेरले /प्रतिनिधी
मिणचे हातकणंगले : समता, बंधुता व धर्मनिरपेक्षाची शिकवण देणारे हे निवासी संकुल खऱ्या अर्थाने संविधान जपणार आहे असे उद्गार स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ दीपक शेटे यांनी काढले .
संविधानाचे विचार जपणं ही आता काळाची गरज बनली आहे आणि ती आपण जपावी हीच अपेक्षा आहे . असे विधान संस्थेचे संस्थापक प्राचार्य डी एस घुगरे यांनी आपल्या प्रस्ताविकात मांडले .
यावेळी शासकीय ग्रेड परीक्षेत ए श्रेणी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
याप्रसंगी संगीत विभागाने देशभक्तीपर गीते म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली .तसेच राजनील पाटील आणि हर्षल कदम या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए बी चव्हाण यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन विभाग बी चे प्रमुख एस एस पाटील यांनी केले .
संस्थेचे सचिव व उपप्राचार्य एम ए परीट यांनी कार्यक्रमाचे आभार मानले .यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते .
No comments:
Post a Comment