Tuesday, 7 February 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाचा १३ फेब्रुवारी 2023 रोजी महामोर्चा


कोल्हापूर /प्रतिनिधी

  आजवर आपण जे जे काही मिळविले आहे ते संघर्ष, मोर्चे, आंदोलने करूनच मिळविले आहे. सद्यस्थितीत आंदोलन ही काळाची गरज आहे. शिक्षकेत्तरांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर निर्णय मिळविणेसाठी शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शनिवार वाडा ते आयुक्त कार्यालय (सेंट्रल बिल्डींग) पुणे असा भव्य मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
   आता कुणाचीही वाट न पाहता आपल्या प्रश्नांसाठी आपणच रस्त्यावर उतरले पाहिजे, आपल्या हक्कासाठीच हा मोर्चा असून प्रचंड संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहून शिक्षकेतरांची ताकद शासनाला दाखवावी. या भव्य मोर्चानंतरही शासनाने आपल्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर ऐन परीक्षांच्या तोंडावर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा महामंडळाचा मानस आहे त्यासाठीही आपणां सर्वांना तयारी ठेवावी लागेल. आपण तर मोर्चात जरूर सामील होणार आहात परंतु आपल्या बरोबर आपल्या जिल्ह्यातील इतरही शिक्षकेत्तर बंधू भगिनी सुध्दा या मोर्चास उपस्थित राहतील याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ रोजी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा घेऊन ठिक सकाळी ११ वाजता शनिवार वाडा, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ कोल्हापूरचे  जिल्हाअध्यक्ष  तथा  महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी
 प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment